धक्कादायक! सियाने चेतनला दिले एक कोटी रुपये, केतनचा पासपोर्ट लपवला; ३१ मेपासून रचला होता हत्येचा कट? पोलिस चौकशीत मोठे खुलासे, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 
 
Pune Ketan Agrawal Murder Case
 
पुणे (Pune Ketan Agrawal Murder Case) : पुण्यातील चर्चित केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सियाने लग्नाच्या खरेदीसाठी केतन अग्रवालकडून एक कोटी रुपये घेतले होते. मात्र, ही रक्कम लग्नाच्या तयारीसाठी खर्च न करता तिने तिचा प्रियकर चेतन चौधरी याला दिल्याचा दावा पोलिसांनी केला.
 
केतन-सिया यांना बाली प्री-वेडिंग ट्रिपसाठी ६ जून रोजी विमानतळावर सोडणारे कॅबचालक वैभव जाधव यांनी महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सियाला बाली येथे जायचे नव्हते. विमानतळाकडे जात असताना या मुद्द्यावर सियाचा भाऊ साहिल याच्यासोबत तिचा जोरदार वाद सुरू होता, अशी माहिती वैभव जाधव यांनी दिली आहे. (Pune Ketan Agrawal Murder Case)

"सियाला कमीत कमी पोलिस कोठडी द्यावी" – सियाच्या वकिलांची मागणी
 
आरोपी सिया गोयल यांच्या वतीने बाजू मांडणारे वकील विपुल दुशिंग यांनी सांगितले की, "सध्या तपास प्राथमिक टप्प्यात आहे. या अवस्थेत निकालाबाबत कोणताही अंदाज व्यक्त करणे घाईचे ठरेल. आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू. त्यानंतर न्यायालय जो काही आदेश देईल, त्याचे आम्ही पालन करू. तसेच सियाला कमीत कमी पोलिस कोठडी द्यावी, अशी आमची मागणी आहे." (Pune Ketan Agrawal Murder Case)

सियाच्या भावाचे वकिलावर गंभीर आरोप!
 
सिया गोयलचा भाऊ साहिल यांनी वकील आशुतोष श्रीवास्तव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. साहिल यांच्या म्हणण्यानुसार, "आशुतोष श्रीवास्तव आमच्यावर दबाव टाकत असून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत आहेत. आमचा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. ते आमची केस लढत नाहीत आणि त्यांना आमच्या वतीने बोलण्याचा कोणताही अधिकार नाही." (Pune Ketan Agrawal Murder Case)
 
इशारा मिळताच केतनला ढकलण्यात आले; पोलिसांचे आणखी तीन दावे!
 
पुण्यातील कॅफेमध्ये हत्येचा कट: सिया आणि चेतनने घटनेच्या एक दिवस आधी पुण्यातील लुल्लानगर येथील एका कॅफेमध्ये हत्येचा कट रचला होता. गुन्ह्यापूर्वी त्यांनी लोहगड किल्ल्याला भेट दिली. त्यांनी हत्येसाठी जागा निवडली आणि सराव केला. पोलीस आता त्यांनी सराव केलेल्या जागेचा तपास करत आहेत.

टोल नोंद टाळण्यासाठी मोटारसायकलचा वापर : पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चेतन चौधरी पुण्यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावरील लोहगड किल्ल्यावर मोटारसायकलने पोहोचला. टोल प्लाझावर वाहनाची नोंद होऊ नये, यासाठी त्याने कारऐवजी मोटारसायकलचा वापर केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. (Pune Ketan Agrawal Murder Case)
 
हुडी घालून किल्ल्यावर चढला : तपासात असेही समोर आले आहे की, चेतनने आपली ओळख लपवण्यासाठी हुडी घालून किल्ला चढला. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याने हुडी काढून काळा टी-शर्ट परिधान केला. घटना घडल्यानंतर तो पुन्हा पुण्याला परतल्याचा पोलिसांचा दावा आहे.
 
सियाच्या इशाऱ्यानंतर केतनला दरीत ढकलले : पोलिसांच्या माहितीनुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर सिया गोयलने पाणी पिण्याचा किंवा बुटाची लेस बांधण्याचा कारणाने चेतन चौधरीला इशारा केला. त्यानंतर मागून आलेल्या चेतनने केतनला दरीत ढकलल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तसेच, केतन पडताना हात पकडू नये म्हणून सिया खाली बसल्याचेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. (Pune Ketan Agrawal Murder Case)
 
३१ मे रोजी हत्येचा कट, १८ जूनला केली हत्या!
 
११ फेब्रुवारीला केतन आणि सिया यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर दोघे एकत्र फिरू लागले. केतनला ट्रेकिंगची आवड असल्याने त्याने सियाला लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाण्याचे विचारले. पोलिसांच्या दाव्यानुसार, याच ठिकाणी सियाच्या मनात केतनच्या हत्येचा कट रचण्याची कल्पना आली. (Pune Ketan Agrawal Murder Case)
 
०६ जून रोजी केतनने बहीण, मित्र आणि सिया यांच्यासोबत बालीला जाण्यासाठी विमानाची तिकिटे बुक केली. पोलिसांच्या दाव्यानुसार, बालीचा प्रवास टाळण्यासाठी सियाने केतनचा पासपोर्ट लपवून ठेवला होता.
 
पोलिसांच्या दाव्यानुसार, १४ जून रोजी केतन आणि सिया लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेले होते. यावेळी सियाने केतनला दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, केतनने झाडाची फांदी पकडल्याने तो थोडक्यात बचावला. त्यानंतर केतनने सियाला, "तू मला धक्का का दिलास?" असा प्रश्न विचारला. त्यावर सियाने, "समोर साप होता. तुला वाचवण्यासाठी मी धक्का दिला," असे उत्तर दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. (Pune Ketan Agrawal Murder Case)
 
पुढे, १९ जून रोजी सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतनने महाबळेश्वरमधील एका रिसॉर्टमध्ये बुकिंग केले होते. मात्र, त्यापूर्वी सियाने केतनला लोहगडावर जाण्यास तयार केले. त्यानुसार दोघे लोहगडावर गेले, तर त्यांच्या मागोमाग चेतन चौधरीही तेथे पोहोचला. संधी मिळताच सियाने इशारा केल्यानंतर चेतनने केतनला दरीत ढकलल्याचा पोलिसांचा दावा आहे. (Pune Ketan Agrawal Murder Case)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर