मुंबई : (Nasrapur Rape and Murder Case) संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर अल्पवयीन बालिका लैगिंक अत्याचार प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने 63 वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
भोर तालुक्यात नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणात तपास यंत्रणा आणि न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने पूर्ण झाला आहे. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 59 दिवसांत तपास पूर्ण करून १ हजार २०० पानाचे आरोप पत्र दाखल करण्यात आले. राज्यातील सर्वात जलद निर्णयप्रक्रिया म्हणून या निर्णयाकडे पहिले जाते आहे.(Nasrapur Rape and Murder Case)
निकालाचे वाचन करताना न्यायाधीश साळुंके म्हणाले, "शिक्षेच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने विचार केला. ॲड. अजय मिसर यांनी हे प्रकरण मृत्युदंडाची शिक्षा होऊ शकते असा युक्तिवाद केला. यासाठी त्यांनी विविध प्रकरणातील 12 न्याय संदर्भ दिले. न्यायालयाने या प्रकरणात 'शंकर खाडे' प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ घेतला. शंकर खाडे प्रकरणात नमूद करण्यात आलेल्या अंतिम निकषाचाही या प्रकरणात प्रत्यय येतो. हा गुन्हा अत्यंत क्रूर स्वरूपाचा असून समाजात तीव्र संताप आणि घृणेची भावना निर्माण करणारा आहे. या गुन्ह्याने न्यायालयाच्या विवेकबुद्धीला धक्का दिला असून आरोपी स्वतःला समाजासाठी धोकादायक व्यक्ती असल्याचे दाखवून देतो. हा गुन्हा कोणत्याही चिथावणीशिवाय करण्यात आला, असे न्यायालयाने म्हटले.(Nasrapur Rape and Murder Case)
मृत्युदंडाची शिक्षा ठरवताना आरोपीच्या भूतकाळातील गुन्ह्यांचाही विचार करण्यात आला. पूर्वीच्या एका प्रकरणात सरकारी पक्षाच्या पुराव्यातील त्रुटींमुळे आरोपीची निर्दोष मुक्तता झाली होती. तसेच एका वृद्ध व्यक्तीने 1996मध्ये आरोपीने एका शेळीशी लैंगिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची साक्ष दिली होती. त्यानंतर आता एका बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणे हा त्यांत क्रूर गुन्हा असून आरोपीमध्ये पश्चात्तापाची कोणतीही भावना दिसून येत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.(Nasrapur Rape and Murder Case)
मुख्यमंत्र्यांचे सभागृहात निवेदन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले," पुण्यातल्या नसरापूर येथे दि. १ मे २०२६ रोजी पुण्यात नसरापूर येथे अतिशय वाईट घटना घडली. ३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या झाली. एफआयआर दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली. पोलिसांनी १६ दिवसांत आरोपपत्र दाखल केले. २८ दिवसांत न्यायालयासमोर आरोप निश्चिती झाली. पहिली साक्ष २६ मे 2026 रोजी नोंदवली व १६ दिवसांत ५५ साक्षीदार यांची उलट तपासणी झाली. दि. २५ जूनला आरोपीला दोषी जाहीर केले. घटना घडल्यानंतर ५५व्या दिवसांत न्यायालयाने त्याला दोषी ठरवले व आज दि. २९ जूनला तिहेरी फाशीची शिक्षा न्यायालयाने दिली आहे.(Nasrapur Rape and Murder Case)
केवळ २९ दिवसांत सर्व ५५ साक्षीदार तपासून व सर्व प्रक्रिया होऊन ही फाशीची शिक्षा झाली आहे न्यायालयाचे विशेष आभार मानतो. चार्जशीट दाखल करेपर्यंत पोलिसांच्या हातात टाइमलाइन असते. पण नंतर ती न्यायालयाच्या हातात असते. न्यायाधीशांचे मी आभार मानतो त्यांनी सुट्टी देखील रद्द केली. अशा गुन्ह्यांना जरब बसवण्यासाठी न्यायालयाने एक नवीन उदाहरण आपल्यासमोर मांडले आहे. पुण्याचे एसपी गिल व त्यांच्या सोबत काम करणाऱ्या अधिकारी यांचे आभार मानतो. या केसमुळे आपल्याला अनुभव आला आहे. ६० दिवसांत आपल्याला फाशी पर्यंत पोहोचवता येते. आपण त्या पीडितेच्या पालकाचे दुख कमी करू शकत नाही पण समाधान असेल की तिहेरी फाशीची शिक्षा दिलेली आहे. अशाच पद्धतीने आपण वेगाने काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत.(Nasrapur Rape and Murder Case)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.