मुंबई : (Maharashtra Monsoon Fishing Ban) माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळावा, भविष्यातील पिढ्यांसाठी मत्स्यसंपदा टिकून राहावी आणि मच्छीमारांच्या जीवित व वित्तहानीचा धोका टाळण्यासाठी यांत्रिक आणि यंत्रचलित मासेमारी नौकांवरील पावसाळी मासेमारीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी हा बंदी कालावधी दि. १ जून ते दि. १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्याच्या शासन आदेशाची माहिती निवेदनाद्वारे सोमवार, दि.२९ रोजी विधानसभा सभागृहात दिली.
मंत्री नितेश राणे यांनी सांगितले, "बंदीचा कालावधी वाढविण्यात यावा अशी मागणी विविध मत्स्यव्यवसाय संस्थांनी वारंवार केली होती. ज्यामुळे मत्स्य उत्पादनावर आणि मासेमारीवर त्याचा चांगला परिणाम होईल. गुजरात राज्यामध्ये हा कालावधी वाढल्यामुळे मत्स्य उत्पादनात वृद्धी झालेली आहे. हा कालावधी प्रजननाचा असतो. यामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान होते. हेच पाहता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून तसेच किनारपट्टी भागातील सर्व लोकप्रतिनिधी आणि मासेमारी संघटनांशी चर्चा करून हा कालावधी वाढविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे."(Maharashtra Monsoon Fishing Ban)
दरम्यान, राज्यात बंदी लागू असताना इतर राज्यांतील मासेमारी नौका महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊन अनधिकृत मासेमारी करत असल्यास त्यांच्याविरुद्ध मत्स्य विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री राणे यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.(Maharashtra Monsoon Fishing Ban)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.