संघाविरोधातील बदनामीकारक वक्तव्याप्रकरणी प्रियांक खर्गेंना न्यायालयाचे समन्स

२१ जुलै रोजी कौर्टात हजर राहण्याचे निर्देश

    29-Jun-2026   
 
Priyank Kharge RSS Defamation Case
 
मुंबई  : (Priyank Kharge RSS Defamation Case) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी बंगळुरू येथील न्यायालयाने कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे आणि कर्नाटक युवा काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद हॅरिस नलपाड यांना समन्स बजावले आहे. बंगळुरू शहराच्या ४२व्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी नुकताच हा आदेश दिला. हा खाजगी तक्रार अर्ज नोव्हेंबर २०२५ मध्ये दाखल करण्यात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, तेजस ए. यांनी दाखल केलेल्या या तक्रारीत काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत कथित बदनामीकारक विधाने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात कर्नाटकचे आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव यांचाही समावेश करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाने त्यांच्यावरील कार्यवाही रद्द केली.(Priyank Kharge RSS Defamation Case)
 
न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५६ (फौजदारी बदनामी) अंतर्गत प्रियंक खर्गे आणि मोहम्मद हॅरिस नलपाड यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्ह्याची दखल घेण्यात येत आहे. दिनेश गुंडू राव यांच्यावरील कार्यवाही मात्र स्थगित करण्यात आली असून, या प्रकरणाची फौजदारी खटला म्हणून नोंद करून दोन्ही आरोपींना दि. २१ जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे समन्स जारी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.(Priyank Kharge RSS Defamation Case)
 
तक्रारीनुसार, प्रियंक खर्गे यांनी १४ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्या अधिकृत 'एक्स' खात्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांविषयी कथित अवमानकारक टिप्पणी असलेली पोस्ट शेअर केली होती. तसेच मोहम्मद हॅरिस नलपाड यांनी एका यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संघाविरोधात कथित बदनामीकारक विधाने केली होती. तक्रारदाराचा आरोप आहे की, या दोन्ही नेत्यांनी संघाची प्रतिमा आणि प्रतिष्ठा मलिन करण्याच्या उद्देशाने ही विधाने केली. त्यामुळे आता प्रियंक खर्गे आणि मोहम्मद हॅरिस नलपाड यांना न्यायालयासमोर हजर राहावे लागणार आहे.(Priyank Kharge RSS Defamation Case)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर