जगाची अर्थनीती शेतीवर आधारित असेल तरच मानवजातीचे अस्तित्व टिकेल!

मोहिनी मोहन मिश्र यांचे प्रतिपादन

    29-Jun-2026   
Agriculture-Based Economy Mohini Mohan Mishra
 
मुंबई : (Agriculture-Based Economy Mohini Mohan Mishra) प्रलयकाळात महासागरात भगवान विष्णूंनी मत्स्यावतार धारण करून सृष्टीचे रक्षण केले. त्याचप्रमाणे भारतीय किसान संघ या महासागरासारख्या विशाल संघटनेत प्रत्येक कार्यकर्त्याने मत्स्यावताराप्रमाणे कार्य केले, तरच जगात नवजीवनाची निर्मिती होईल. जगाची अर्थनीती शेतीवर आधारित असेल तरच मानवजातीचे अस्तित्व टिकू शकेल", असे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय महामंत्री मोहिनी मोहन मिश्र यांनी केले.
 
जयपूर प्रांताच्या प्रांतीय प्रतिनिधी सभेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. राजस्थान राज्य पशुधन व्यवस्थापन व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित या बैठकीला भारतीय किसान संघाचे प्रदेश, प्रांत आणि जिल्हास्तरीय कार्यकारिणीतील समर्पित कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Agriculture-Based Economy Mohini Mohan Mishra)
 
उपस्थितांना संबोधित करताना मोहीनी मोहन मिश्र पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळातील प्रलयाचे स्वरूप वेगळे असेल. जगाची अर्थव्यवस्था जर दारुगोळ्यावर आधारित असेल, तर विनाश अटळ आहे; पेट्रोलवर आधारित असेल, तरी विनाश होईल; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञानावर आधारित असेल, तरीही विनाश टळणार नाही. जगाचे खरे पुनर्निर्माण आणि शाश्वत विकास तेव्हाच शक्य आहे, जेव्हा संपूर्ण जगाची अर्थनीती शेतीकेंद्रित असेल.(Agriculture-Based Economy Mohini Mohan Mishra)
 
या बैठकीस भारतीय किसान संघाचे अखिल भारतीय सह-संघटनमंत्री गजेंद्र सिंह, अखिल भारतीय महिला प्रमुख मंजू दीक्षित, बीज प्रमुख कृष्ण मुरारी, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण सिंह, प्रदेश महामंत्री तुलछाराम यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याशिवाय राजस्थानातील १८ जिल्ह्यांतील जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले.(Agriculture-Based Economy Mohini Mohan Mishra)
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर