रवींद्र नाट्यमंदिरात रंगणार श्रीशिवराज्याभिषेक सोहळा

    28-Jun-2026   
Shivrajyabhishek Ceremony Ravindra Natya Mandir
 
मुंबई : (Shivrajyabhishek Ceremony Ravindra Natya Mandir) सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालय (स्वायत्त), दादर (प.) आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २९ जून रोजी रविंद्र नाट्यमंदिर येथे श्रीशिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता सोहळा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
 
या सोहळ्यामध्ये राज्याभिषेकाचे ऐतिहासिक चित्रदर्शी सादरीकरण होणार असून, त्याचबरोबर पोवाडे गायन कार्यक्रम संपन्न होईल. डॉ. केदार फाळके लिखित, 'श्रीशिवराज्याभिषेकः नव्या युगाचा प्रारंभ' पुस्तकाचे प्रकाशन इथे संपन्न होणार आहे. त्याचबरोबर 'वारसा शौर्याचा' छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आधारित भव्य ऐतिहासीक प्रस्तुती प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
 
त्याचबरोबर शिवचरित्रावरील प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीपदादा रावत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.(Shivrajyabhishek Ceremony Ravindra Natya Mandir)
 
 




मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
संबंधित मजकूर