सेशेल्स / व्हिक्टोरिया (PM Modi Seychelles Award) : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सेशेल्सच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान भारत आणि सेशेल्स यांच्यात पर्यावरण आणि संरक्षण क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे करार करण्यात आले. तसेच, सेशेल्सची सागरी सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी भारताने 'मेड इन इंडिया' फास्ट पेट्रोल व्हेसल सेशेल्सच्या नौदलाकडे सुपूर्त केली. भारत आणि सेशेल्समधील संबंधांना अधिक मजबुत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान ''गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन्मान समारंभानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हर्मिनी यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत दोन्ही देशांतील सागरी सुरक्षा, सागरी व्यापार तसेच परस्पर सहकार्य वाढविण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. (PM Modi Seychelles Award)
बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या संसदेला संबोधित करतील. या भाषणानंतर जगातील २० देशांच्या संसदांना संबोधित करणारे ते पहिले पंतप्रधान ठरतील. भारताच्या परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण मानला जात असून, जागतिक स्तरावर भारतासाठी ही अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वपूर्ण बाब ठरणार आहे. (PM Modi Seychelles Award)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्यावरण संरक्षण विकासातील त्यांच्या नेतृत्वाबद्दल सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान 'गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन' प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार त्यांच्या 'ग्रीन व्हिजन' (हरित दृष्टिकोन) आणि पर्यावरणपूरक विकासाच्या धोरणाला जागतिक स्तरावर मिळालेली मान्यता मानली जात आहे. (PM Modi Seychelles Award)
हवामान बदलाचा सामना, हरित विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान मोदींना मिळालेल्या जागतिक सन्मानांच्या मालिकेतील हा आणखी एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. यापूर्वी, मे २०२६ मध्ये अन्न व कृषी संघटनेने (FAO) अन्नसुरक्षा बळकट करणे, कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवणे आणि शेतीला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांना 'ॲग्रिकोला पदक' प्रदान केले होते. (PM Modi Seychelles Award)
तसेच, २०१८ मध्ये आर्थिक विकास, जागतिक सहकार्य आणि सर्वसमावेशक विकासाला चालना दिल्याबद्दल त्यांना 'सोल शांतता पुरस्कार' प्रदान करण्यात आला होता. याच वर्षी, पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाविरोधातील योगदानाची दखल घेत संयुक्त राष्ट्रांनी त्यांना 'चॅम्पियन्स ऑफ द अर्थ' पुरस्कार देऊन गौरविले होते. (PM Modi Seychelles Award)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.