मुंबई : (Navnath Ban Uddhav Thackeray BJP Yavatmal) यवतमाळामध्ये ४३ वर्षांपूर्वीच भाजपची भक्कम पायाभरणी झाली होती, असे प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरेंना दिले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी आणि माजी आमदार तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील दिवंगत गंगाधरराव फडणवीस यांचा जुना फोटो ट्विट करत बन यांनी ठाकरेंवर पलटवार केला.
नवनाथ बन म्हणाले की, "उद्धव ठाकरे तुम्ही म्हणालात ४० वर्षांपूर्वी यवतमाळात भाजपाचे कार्यालय तरी होते का? पण तुम्ही पुन्हा-पुन्हा तीच चूक करत असून अशाने उरलासुरला उबाठा गट अजिबात वाढणार नाही." (Navnath Ban Uddhav Thackeray BJP Yavatmal)
ते पुढे म्हणाले की, "१९८३ मध्ये म्हणजेच ४३ वर्षापूर्वी यवतमाळकरांनी १.५१ लाख रुपये पक्षकार्यासाठी गोळा करून दिले होते. हे यवतमाळकरांचे भाजपा विचारांवरचे प्रेम होते आणि त्यावेळी आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील दिवंगत गंगाधरराव फडणवीससुद्धा उपस्थित होते. त्यामुळे पुढच्या काही दिवसात दौरे जरूर करा, पण उगाच वाफ दवडू नका," असा टोला त्यांनी लगावला. (Navnath Ban Uddhav Thackeray BJP Yavatmal)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....