मुंबई : (Mumbai Dam Water Stock) मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरण क्षेत्रांमध्ये यंदा पावसाने अत्यंत संथ सुरुवात केल्यामुळे मुंबईवर पाणी कपातीचे संकट गडद होऊ लागले आहे. जून महिना संपत आला तरी मुंबईला वर्षभर पाणी पुरवणाऱ्या प्रमुख ७ धरणांच्या परिसरात अपेक्षित पाऊस झालेला नाही. मुंबई महापालिकेच्या जल अभियंता विभागाने २७ जून २०२६ रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सर्व धरणांमधील मिळून एकूण उपयुक्त पाणीसाठा अवघा १,०५,७५५ दशलक्ष लिटर म्हणजेच ७.३१ टक्के इतकाच शिल्लक राहिला आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. गेल्या वर्षी (२०२५) याच तारखेला धरणांमध्ये तब्बल ३७.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, तर २०२४ मध्ये तो ५.२९ टक्के होता. यंदा पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे चिंतेचे वातावरण आहे.(Mumbai Dam Water Stock)
मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवणाऱ्या प्रमुख धरणांच्या क्षेत्रात पावसाची अत्यंत संथ गती आहे. भातसा (८८ मिमी), तानसा (१०१ मिमी) आणि मिडल वैतरणा (७१ मिमी) दुसरीकडे, अप्पर वैतरणा धरण क्षेत्रात आतापर्यंत ३७६ मिमी पाऊस झाला असला, तरी धरणाची पाणी पातळी सध्या निचांकी पातळीच्या खाली गेली आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या या धरणातील उपयुक्त साठा सध्या 'शून्य' दाखवत असून, तिथून आपत्कालीन पाण्याचा उपसा सुरू आहे.
मुंबईला दररोज धरणांमधून सुमारे ३,९०० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्याचा ७.३१ टक्के साठा पाहता हा साठा मर्यादित काळासाठीच पुरू शकतो. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत धरण परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, तोपर्यंत पाणी संकट टाळण्यासाठी मुंबईकरांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने आणि जपून करावा, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.(Mumbai Dam Water Stock)
धरण क्षेत्रातील सद्यस्थिती (२७ जून २०२६ रोजी सकाळी ६ वा.)
तलाव/एकूण पाऊस (मिमी)/सध्याचा उपयुक्त जलसाठा (दशलक्ष लिटर)/पाणीसाठा (टक्केवारी)