मुंबई : (BJP Yuva Morcha Mann Ki Baat Gen Next) भाजप युवा मोर्चा, मुंबईच्या वतीने रविवारी मुंबईतील ७ विविध ठिकाणी ‘मन की बात – Gen Next सोबत’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई भाजपचे अध्यक्ष आ. अमीत साटम यांच्या मार्गदर्शनाखाली तथा भाजयुमो मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १३५ व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले.
यावेळी मंत्री पंकजा मुंडे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार मुरजी पटेल, माजी खासदार मनोज कोटक, नगरसेवक तेजिंदर सिंह तिवाना, भाजपा मुंबई सचिव तथा नगरसेवक प्रतीक कर्पे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक उपस्थित होते.
युवा पिढीपर्यंत पंतप्रधानांचे विचार सहज आणि आधुनिक वातावरणात पोहोचावेत, या उद्देशाने हा उपक्रम कॉफी शॉप्स आणि मॅकडोनाल्ड्ससारख्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ‘Gen Next’ अर्थात नव्या पिढीला राष्ट्रविकासाच्या प्रवाहाशी जोडणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि देशहिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा घडवून आणणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता. या कार्यक्रमानंतर उपस्थित युवकांनी देशाचा विकास, स्टार्टअप, शिक्षण, आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रनिर्माणातील युवाशक्तीची भूमिका यांसारख्या विविध विषयांवर उत्स्फूर्त चर्चा केली.(BJP Yuva Morcha Mann Ki Baat Gen Next)
मुंबई भाजयुमोचे अध्यक्ष दीपक सिंह म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा केवळ रेडिओ कार्यक्रम नसून देशातील कोट्यवधी युवकांना प्रेरणा देणाऱ्या लोकचळवळीत रूपांतर झाले आहे. ‘मन की बात - Gen Next सोबत’ या उपक्रमातून आम्ही युवकांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी एकत्र आणून पंतप्रधानांच्या विचारांशी, राष्ट्रनिर्माणाच्या संकल्पाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यातही भाजयुमो युवकांना समाजहित आणि राष्ट्रहिताच्या विविध उपक्रमांशी जोडण्यासाठी असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम सातत्याने आयोजित करत राहील.”(BJP Yuva Morcha Mann Ki Baat Gen Next)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....