प्रभादेवीत सोमवारी 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' नाटकाचा ५१ वा प्रयोग

    27-Jun-2026   
Yugpravartak Dr. Hedgewar Play
 
मुंबई : (Yugpravartak Dr. Hedgewar Play) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त साकारण्यात आलेल्या 'युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार' या भव्य-दिव्य दोन अंकी नाटकाचा ५१ वा प्रयोग सोमवार, दि. २९ जून रोजी सायंकाळी ६ वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात रंगणार आहे. या विशेष प्रयोगाला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
नागपूरच्या नादब्रह्म संस्थेची निर्मिती असलेल्या या नाटकाचे लेखन डॉ. अजय प्रधान यांनी केले असून, दिग्दर्शनाची धुरा सुबोध सुरजीकर यांनी सांभाळली आहे. नाटकासाठी संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवीजी भुसारी यांचे मार्गदर्शन या लाभले आहे.
 
सन २०२५ मध्ये नागपुरातून या नाटकाचा शुभारंभ झाला. त्यानंतर महाराष्ट्रासह गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि हैदराबाद येथे या नाटकाचे यशस्वी प्रयोग सादर झाले असून, प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव हेडगेवार यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, संघ स्थापनेमागील ध्येय, त्याग, राष्ट्रभक्ती आणि संघकार्याचा उगम यांचे प्रभावी नाट्यरूप दर्शन या नाटकातून घडते. सुमारे ४० कलाकार आणि तंत्रज्ञांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या या भव्य निर्मितीत आधुनिक प्रकाशयोजना, नेपथ्य, ध्वनी-संगीत आणि तांत्रिक सादरीकरणाची प्रभावी सांगड घालण्यात आली आहे.(Yugpravartak Dr. Hedgewar Play)
 
आतापर्यंतच्या सर्व प्रयोगांना लाभलेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर मुंबईतील हा ५१ वा प्रयोगही संस्मरणीय ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून, रसिकांनी विशेषतः युवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.(Yugpravartak Dr. Hedgewar Play)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर