रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी साहाय्य

    27-Jun-2026   
Raigad Fort Conservation
 
रायगड : (Raigad Fort Conservation) छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन कार्यरत असून रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार ३५३ वा राज्याभिषेक दिन सोहळा शनिवारी, दुर्गराज रायगडावर संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री ते बोलत होते.
 
याप्रसंगी रोहयो मंत्री भरत गोगावले, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "रायगडावरील पाण्याची समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार गुरुत्वाकर्षण आधारित पाणीपुरवठा योजनेस तातडीने मान्यता देण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या सन्मानाचा घालून दिलेला आदर्श शासनाच्या धोरणांत प्रतिबिंबित होत असून, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कोणत्याही अडथळ्यांशिवाय निरंतर सुरू राहील."
 
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
 
ते पुढे म्हणाले की, "कमी पाऊस किंवा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली तरी शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शासकीय तिजोरीवर पहिला अधिकार अन्नदाता बळीराजाचाच आहे. तसेच, रायगडासह महाराष्ट्रातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त १२ ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर त्यांची कीर्ती वृद्धिंगत करण्यासाठी शासन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील." (Raigad Fort Conservation)
 
 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर