श्रीगणेश एसआरए विलेपार्ले भूमिपूजन सोहळा

रहिवाशांना गतीने दर्जेदार घर उपलब्ध करून द्यावे : प्रवीण दरेकर

    27-Jun-2026
 
 
Pravin Darekar Performs Bhoomipujan
 
मुंबई : (Pravin Darekar Performs Bhoomipujan) आयुष्यात घर होणे हे सर्वसामान्य माणसाचे स्वप्न आहे. त्यामुळे विकासकाने श्री गणेश एसआरएमधील रहिवाशांना गतीने दर्जेदार घर उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन भाजपा गटनेते व महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.
 
विलेपार्ले येथील श्री गणेश एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचा भूमिपूजन सोहळा शनिवार, दि.२७ रोजी आ. प्रवीण दरेकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक प्रकाश दरेकर, श्री गणेश एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे मुख्य प्रवर्तक अजय ओरपे, सचिव किशोर माने, खजिनदार शीतल महाडिक, विकासक तेजिंदर सिंग मक्कर, राकेश सेठ यांसह मोठ्यासंख्येने रहिवाशी उपस्थित होते.(Pravin Darekar Performs Bhoomipujan )
 
यावेळी रहिवाशांशी संवाद साधताना आ. दरेकर म्हणाले की, एसआरए प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी काय परिश्रम असतात त्याची कार्यकर्ता म्हणून मला कल्पना आहे. त्यात किती अडचणी, प्रश्न असतात या सर्वांची सोडवणूक करत आज पूर्णपणे या कामाचे भूमिपूजन होत आहे. मला विश्वास आहे येथे लवकरात लवकर १८ महिन्यात इमारत पूर्ण होऊन रहिवाशांना घर मिळेल. मुंबईत आज एसआरए प्रकल्प मोठ्या प्रमाणावर होत आहेत. क्लस्टरच्या माध्यमातून पुनर्विकास होतोय.(Pravin Darekar Performs Bhoomipujan )
 
दरेकर पुढे म्हणाले की, गृहनिर्माणच्या अनेक योजना मुंबईत आपण आणत आहोत. स्वतःची इमारत पुनर्विकसित करायची असेल तर मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सहकार्य केले जाते. सरकार वेगवेगळ्या परवानगी देतेय. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या घरात जाता येतेय. अशा प्रकारची योजना मुंबईत कार्यान्वित होतेय. त्यातून मध्यमवर्गीय माणसाला मोठे घर मिळत आहे. शेवटी घर हे आपले स्वप्न आहे. त्यामुळे विकासकांनी गतीने व दर्जेदार अशा प्रकारचे घर येथील रहिवाशांना उपलब्ध करून द्यावे, असे आवाहनही दरेकरांनी केले.(Pravin Darekar Performs Bhoomipujan )
 
 
 
 




संबंधित मजकूर