गणपतीत कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! कोकण रेल्वेचे आरक्षण लवकरच सुरू होणार, सर्व महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या

 
Ganpati Train Reservation 2026
 
मुंबई: (Ganpati Train Reservation 2026) गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची तयारी करणाऱ्या लाखो कोकणवासीयांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यंदा सोमवार, १४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीगणेश चतुर्थी असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्यांच्या आरक्षणाला १३ जुलै पासून सुरुवात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या काळात रेल्वे तिकिटांसाठी मोठी स्पर्धा अपेक्षित असल्याने प्रवाशांनी आरक्षणाच्या तारखा लक्षात ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Ganpati Train Reservation 2026)
 
कोकणातील गणेशोत्सव हा लाखो चाकरमान्यांसाठी भावनिक उत्सव मानला जातो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, भिवंडी आणि मुंबई महानगर प्रदेशात राहणारे लाखो कोकणवासी या काळात आपल्या मूळ गावी जाण्यासाठी रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात. (Ganpati Train Reservation 2026)
 
१३ जुलैपासून सुरू होणार आरक्षण... (Ganpati Train Reservation 2026)
 
भारतीय रेल्वेच्या १२० दिवसांच्या आगाऊ आरक्षण नियमानुसार गणेशोत्सवासाठी धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण जुलै महिन्यापासून सुरू होणार आहे. (Ganpati Train Reservation 2026)
 
११ सप्टेंबरच्या रात्री सुटणाऱ्या गाड्यांचे आरक्षण: १३ जुलै २०२६
१२ सप्टेंबरच्या गाड्यांचे आरक्षण: १४ जुलै २०२६
१३ सप्टेंबरच्या गाड्यांचे आरक्षण: १५ जुलै २०२६
१७ सप्टेंबरला सुटणाऱ्या गाड्यांचे (गौरी पूजनासाठी): १९ जुलै २०२६
यंदाचा गणेशोत्सव... (Ganpati Train Reservation 2026)
१४ सप्टेंबर (सोमवार): श्रीगणेश चतुर्थी
१५ सप्टेंबर: ऋषी पंचमी
१७ सप्टेंबर: ज्येष्ठा गौरी आगमन
१८ सप्टेंबर: गौरी पूजन
१९ सप्टेंबर: गौरी विसर्जन
२५ सप्टेंबर (शुक्रवार): अनंत चतुर्दशी आणि गणेश विसर्जन
 
कोणत्या गाड्यांना सर्वाधिक मागणी? (Ganpati Train Reservation 2026)
 
दरवर्षी खालील नियमित गाड्यांच्या तिकिटांसाठी सर्वाधिक गर्दी पाहायला मिळते. (Ganpati Train Reservation 2026)
 
वंदे भारत एक्सप्रेस
जनशताब्दी एक्सप्रेस
कोकणकन्या एक्सप्रेस
मांडवी एक्सप्रेस
तुतारी एक्सप्रेस
मत्स्यगंधा एक्सप्रेस
नेत्रावती एक्सप्रेस
 
या गाड्यांमधील आरक्षण काही मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी आरक्षण सुरू होताच तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करावा. (Ganpati Train Reservation 2026)
 
ठाणे स्थानकावर अतिरिक्त सुविधा... (Ganpati Train Reservation 2026)
 
गणेशोत्सवाच्या काळात तिकीटांसाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन ठाणे रेल्वे स्थानकात दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तासन्तास रांगेत उभे राहणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. (Ganpati Train Reservation 2026)
 
रेल्वे प्रवासालाच का पसंती? (Ganpati Train Reservation 2026)
 
गणेशोत्सवाच्या काळात खासगी बससेवांचे भाडे मोठ्या प्रमाणात वाढते. काही मार्गांवर हजारो रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागतो. त्याउलट रेल्वे प्रवास हा तुलनेने स्वस्त, सुरक्षित आणि आरामदायी असल्यामुळे बहुतांश कोकणवासी रेल्वे आरक्षणालाच प्राधान्य देतात. (Ganpati Train Reservation 2026)
 
प्रवाशांसाठी सूचना... (Ganpati Train Reservation 2026)
 
आरक्षणाच्या तारखा आधीच लक्षात ठेवा.
IRCTC वेबसाइट किंवा अधिकृत ॲपवर लॉगिन माहिती तयार ठेवा.
प्रवाशांची नावे, वय आणि ओळखपत्राची माहिती आधीच भरून ठेवा.
आरक्षण सुरू होताच तत्काळ बुकिंग करा.
प्रतीक्षा यादी टाळण्यासाठी पर्यायी गाड्यांचाही विचार करा.
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर