विश्वास नांगरे पाटील यांच्या वक्तव्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही;मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

    27-Jun-2026   
 
Chandrashekhar Bawankule on RSS
 
नागपूर : (Chandrashekhar Bawankule on RSS) आदर्श संस्कार, संस्कृती असलेल्या मजबूत भारताला संघाने देशगौरव दिला आहे. संघ हा देशाचा मजबूत कणा आहे. त्यामुळे त्याबद्दल चांगले उद्गार काढले असल्यास राज ठाकरे किंवा इतर कुणीही वेगळा विचार करण्याची आणि त्याकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
 
आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. नागपूर येथे त्यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र विमान प्रवासावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक आदर्श मुख्यमंत्री आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साद देत मुख्यमंत्री व्यावसायिक विमानाने प्रवास करत आहेत. त्यांनी खासगी विमान वापरलेले नाही. ते आमच्याकरिता आदर्श आहेत. उद्धव ठाकरेंनीही पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रवासी विमानाने जाणे पसंत केले, याबद्दल त्यांचेही आभार मानतो.
 
देशहितासाठी पंतप्रधानांनी एखादा निर्णय घेतला असल्यास त्या निर्णयाला प्रतिसाद देत या दोन्ही नेत्यांनी प्रवासी विमानाने प्रवास करत आदर्श उदाहरण तयार केले आहे.विमानात बसल्यावर चर्चा होतच असतात. प्रत्येकवेळी राजकीय चर्चा होत नाही, कधी कौटुंबिक चर्चाही होतात. विमानात अनेक लोक ऐकणारे असतात त्यामुळे राजकीय चर्चा विमानात होऊ शकत नाहीत."
 
 
 
संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, "संजय राऊत काहीही बोलले असले तरी माझे आयुष्य भाजपला समर्पित झाले आहे. ३५ वर्षांचा प्रवास झाला असून जीना यहां मरना यहां अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते उपरोधिक बोलले असतील."
 
प्रादेशिक परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचाराबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, "या विषयावर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी अनेकदा चर्चा केली आहे. दोषी आढळणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. या प्रकरणाची चौकशी केली जाईल."(Chandrashekhar Bawankule on RSS)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर