मुंबई : (Uddhav Thackeray Devendra Fadnavis Same Flight) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच खासगी विमानाने प्रवास टाळावा असे आवाहन केले. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय नेते हे खासगी जेट आणि हेलिकॉप्टरने प्रवास टाळून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना दिसत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील महाराष्ट्राच्या विविध भागात दौरे करताना रेल्वे आणि विमान प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. याचदरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानाने प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
शुक्रवार, दि.२६ जून रोजी इंडिगोच्या विमानातून दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला आहे. यावेळी भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंशी हस्तांदोलन केले. तसेच दोन्ही नेत्यांनी एकमेकांची विचारपूस देखील केली आहे. यावेळी उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे इतर नेते देखील उपस्थित होते.(Uddhav Thackeray Devendra Fadnavis Same Flight)
हेच पाहता मुंबईहून नागपूरला रवाना होणाऱ्या विमानात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन देखील केले. उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शनिवार, दि. 27 जून पासून महाराष्ट्र दौऱ्यावर जाणार असून यवतमाळ, वाशीम, हिंगोली, परभणी शहर, धाराशीव शहर आणि शिर्डी येथे मतदारांशी संवाद साधणार आहेत.(Uddhav Thackeray Devendra Fadnavis Same Flight)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.