मुंबई : (Ram Temple Donation Scam) अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणगीतील कथित गैरव्यवहाराचे प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टशी संबंधित आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांवरही संशयाची सुई फिरत असून, या प्रकरणाचा तपास पूर्ण केल्यानंतर विशेष तपास पथकाने (एसआयटीने) आपला अहवाल सरकारकडे सादर केला. एसआयटीच्या शिफारशीनुसार ट्रस्टने आठ जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.
अशी माहिती आहे की, या प्रकरणात ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. शुक्रवारी चंपत राय यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत ट्रस्टचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्रा यांनीही पदत्याग केला. देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या प्रकरणात सुमारे १८ दिवसांनंतर ट्रस्टने अखेर गुरुवारी एफआयआर दाखल केली. या प्रकरणात ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे चालक टिन्नू यादव याच्यासह आठ जणांना आरोपी ठरवण्यात आले आहे. (Ram Temple Donation Scam)
जैन हवाला प्रकरणात आरोप झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला होता आणि निर्दोष सिद्ध झाल्यानंतरच निवडणूक लढवली होती. त्याच धर्तीवर, चौकशी पूर्ण होईपर्यंत चंपत राय यांनी स्वेच्छेने पदाचा त्याग करावा, अशी मागणी काही स्तरांतून व्यक्त केली जात आहे. (Ram Temple Donation Scam)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक