अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांची मदत

शासन निर्णय जारी

    26-Jun-2026   
 
Maharashtra Unseasonal Rain Compensation
 
मुंबई : (Maharashtra Unseasonal Rain Compensation) एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिके तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी दिली असून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
 
या शासन निर्णयानुसार राज्यातील २ लाख ६७ हजार ६५६ शेतकरी आणि १ लाख ६३ हजार ७८८.७५ हेक्टर क्षेत्र अवकाळी पावसामुळे बाधित झाले असून त्यांच्यासाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे.
 
कोणत्या विभागाला किती मदत?
 
अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील १ हजार ४७६ शेतकरी, ७५७.३१ हेक्टर क्षेत्रासाठी ९६.२६ लाख रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यातील १२ हजार ५२ शेतकरी, ६,७८८.६३ हेक्टर क्षेत्रासाठी १८ कोटी ९० लाख ३९ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. या विभागातील एकूण १३ हजार ५२८ शेतकरी व ७,५४५.९४ हेक्टर क्षेत्रासाठी १९ कोटी ८६ लाख ६५ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.मुंबई : (Maharashtra Unseasonal Rain Compensation)
 
नागपूर विभागातील भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील एकूण १४ हजार ६१३ शेतकरी व ८,१६०.५३ हेक्टर क्षेत्रासाठी १७ कोटी ३४ लाख ९७ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील २ हजार ५०६ शेतकरी व १,९२३.२० हेक्टर क्षेत्रासाठी २ कोटी २ लाख ७९ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे.
 
नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील एकूण १ लाख २९ हजार ८९६ शेतकरी व ५५ हजार ५५५.९० हेक्टर क्षेत्रासाठी १०३ कोटी ३२ लाख ७७ हजार रुपये मदत मंजूर झाली आहे.
 
आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
 
कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तब्बल १ लाख ३६ हजार ७५१ शेतकरी व ९२ हजार ३६२.७८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्यांच्यासाठी २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मदतीत आंबा व काजू फळबागांच्या नुकसानीचा मोठा वाटा असून कोकण विभागासाठी मंजूर करण्यात आलेला हा निधी राज्यातील सर्वाधिक आहे. त्यामुळे हजारो आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील ३,७६२ शेतकरी व २,२४१.३० हेक्टर क्षेत्रासाठी ४ कोटी ३१ लाख १ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आली आहे.मुंबई : (Maharashtra Unseasonal Rain Compensation)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर