मुंबई: (Lalit Prabhakar in Ajmal Kasab Role) 'ईठा'चा दमदार टीझर प्रदर्शित केल्यानंतर मॅडॉक फिल्म्सने आणखी एका महत्त्वाकांक्षी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी' हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून नुकतेच चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि कलाकारांचे लूक सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. पोस्टर प्रदर्शित होताच हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे. (Lalit Prabhakar in Ajmal Kasab Role)
हा चित्रपट ज्येष्ठ विधिज्ञ आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित आहे. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवादी अजमल कसाब याला न्यायालयातून फाशीची शिक्षा मिळवून देण्यात उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या या संघर्षमय प्रवासाची कथा 'प्रहार'मधून मोठ्या पडद्यावर मांडली जाणार आहे. (Lalit Prabhakar in Ajmal Kasab Role)
राजकुमार राव साकारणार उज्ज्वल निकम यांची भूमिका....
चित्रपटातील सर्वात महत्त्वाची भूमिका अभिनेता राजकुमार राव साकारणार आहे. विशेष म्हणजे, उज्ज्वल निकम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून त्यांनी ही भूमिका साकारण्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. कृत्रिम मेकअप किंवा प्रोस्थेटिक्सचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी साधर्म्य साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Lalit Prabhakar in Ajmal Kasab Role)
ललित प्रभाकरचा अजमल कसाब लूक पाहून चाहते थक्क...
या चित्रपटातील आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे मराठी अभिनेता ललित प्रभाकर. आजवर रोमँटिक आणि सकारात्मक भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला ललित यावेळी प्रथमच नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. तो दहशतवादी अजमल कसाबची भूमिका साकारणार असून त्याचा पहिला लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (Lalit Prabhakar in Ajmal Kasab Role)
ललितचा लूक पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. "खरंच हा ललित प्रभाकर आहे का?", "कसाबच्या भूमिकेसाठी जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन", "मराठीचा चॉकलेट बॉय आता सर्वात आव्हानात्मक भूमिकेत" अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून सोशल मीडियावर उमटत आहेत. (Lalit Prabhakar in Ajmal Kasab Role)
'प्रहार – द उज्ज्वल निकम स्टोरी'मध्ये राजकुमार राव आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत वामिका गब्बी, जयदीप अहलावत आणि सिकंदर खेर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अविनाश अरुण यांनी केले असून निर्मिती दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सने केली आहे. (Lalit Prabhakar in Ajmal Kasab Role)
देशातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या न्यायालयीन लढ्यांपैकी एका ऐतिहासिक प्रकरणावर आधारित हा चित्रपट असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ७ ऑगस्ट रोजी हा चित्रपट देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Lalit Prabhakar in Ajmal Kasab Role)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.