कलियुगात संघटन हीच समाजाची सर्वात मोठी शक्ती : आलोक कुमार

    08-May-2026   
Total Views |
Sangh Shatabdi Varsh
 
मुंबई : (Sangh Shatabdi Varsh) सन १९२५ मध्ये डॉ. हेडगेवार यांनी समाज संघटित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. फाळणीच्या काळात संघ स्वयंसेवकांनी ३००० हून अधिक मदत शिबिरांचे संचालन करून समाजसेवेचे कार्य केले. कलियुगात संघटन हीच समाजाची सर्वात मोठी शक्ती आहे", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकरार्यवाह आलोक कुमार यांनी केले. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शिमलातील जिल्हा महासूच्या सैंज खंडात प्रमुख जनगोष्ठीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
 
उपस्थितांना संबोधित करताना आलोक कुमार पुढे म्हणाले, संघाचा स्वयंसेवक भारताला माता मानून सेवा करतो आणि त्याबद्दल कोणताही अहंकार बाळगत नाही. सध्या संघ पंच परिवर्तनाच्या विषयांना समाजापर्यंत पोहोचवत आहे. कुटुंब संस्थेला सक्षम करण्यावर भर देत त्यांनी सांगितले की, पुढील १० ते १५ वर्षांत पंचपरिवर्तनावर प्रभावी कार्य झाले, तर भारत अखंड आणि संघटित राष्ट्र म्हणून अधिक सक्षम बनेल. (Sangh Shatabdi Varsh)
 
हेही वाचा : Dadar Vasant Smriti Baithak : ‘वसंत स्मृती’, दादर येथे भाजपा मुंबई आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
 
कार्यक्रमाच्या शेवटी जिज्ञासा समाधान सत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये उपस्थित बंधू-भगिनींनी आपले प्रश्न मांडले. या संगोष्ठीत ३०० हून अधिक प्रबुद्ध नागरिक सहभागी झाले होते. (Sangh Shatabdi Varsh)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक