पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे व्हावीत - अमित साटम

    08-May-2026
Total Views |
ameet satam
 
मुंबई : (Mumbai Municipal Corporation) "पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पारदर्शकपणे, वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना पावसाळ्यात कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत." अशी प्रतिक्रिया अमित साटम यांनी शुक्रवार दि.८ रोजी दिली.
 
मुंबई महापालिकेमार्फत पश्चिम उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार दि.८ रोजी एका विशेष पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी एस. एन. डी. टी वुमेन्स युनिव्हर्सिटी, जुहू नाला येथील नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रगतीचा आढावा घेतला.
 
हेही वाचा :  "मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त!" वाकोल्यातील बाजारात महापौर रितू तावडे यांनी कोळी भगिनींना दिला शब्द
 
यावेळी मुंबई महानगरपालिका सभागृह नेते गणेश खणकर , नगरसेविका हेतल गाला, अविनाश ढाकणे (अतिरिक्त आयुक्त) व पर्जन्य जलवाहिनी विभागाचे प्रमुख अभियंता तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
पाहणीदरम्यान कामाचा दर्जा आणि गती कायम राखण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही यावेळी साटम यांनी दिल्या.(Mumbai Municipal Corporation)