राणी व्हिक्टोरियाची मुलगी, राजकुमारी लुईस कॅरोलिन अल्बार्टाच्या नावाने असलेल्या अल्बार्टा राज्यातील लाखो लोकांनी कॅनडातून वेगळे व्हायचे, या मतावर सहमती दर्शवली आहे. तसेही, अल्बार्टा हा कॅनडाचा नैसर्गिक भूभाग नाही; तर कॅनडाने ब्रिटिशांकडून अल्बार्टा प्रांताला विकत घेतले होते. हा इतिहास ५० लाख लोकसंख्या असलेला अल्बार्टा विसरलेला नाही. यामध्ये अमेरिकेची भूमिका काय असेल?
तर, अल्बार्टामध्ये १७व्या शतकापूर्वी स्थानिक आदिवासी लोक राहायचे. १७व्या शतकामध्ये इथे युरोपियन पोहोचले. भारतात कापूस गिरण्या आणि अल्बार्टामध्ये फरचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. ‘बे हडसन’ नावाची कंपनी हे काम करू लागली. कंपनीने स्थानिक आदिवासींसोबत जमिनीचा व्यवहार केला आणि आदिवासींसाठी एक मर्यादित जागा ठरवून दिली. त्याच जागेत त्यांनी राहायचे, बाकीची जमीन या कंपनीची. असे करता-करता अल्बार्टावर ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. पण, पुढे जगभरात ब्रिटिशांच्या साम्राज्याला सुरुंग लागण्यास सुरुवात झाली होती आणि त्याच वेळी जगाच्या नकाशावर अमेरिका महासत्ता म्हणून उदय पावत होती. तत्कालीन ब्रिटिश सरकारला भीती होती की, अमेरिका अल्बार्टाची जमीन हडप करेल. त्यामुळे या भागात कॅनेडियन नियंत्रण मजबूत करण्यासाठी आणि अमेरिकेला रोखण्यासाठी ब्रिटिशांनी १९०५ साली अल्बार्टा कॅनडाकडे हस्तांतरित केला. कॅनडाने हा प्रस्ताव स्वीकारला. कारण, १८८०च्या दशकात कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेच्या आगमनामुळे या भागात वसाहत करणे, शेती करणे आणि व्यापार करणे सोपे झाले होते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अल्बार्टाच्या मूळ नागरिकांना कुठेही सहभागी करण्यात आले नव्हते. ब्रिटिशांनी त्यांच्यावर पारतंत्र्य लादले आणि पुढे अल्बार्टाला कॅनडाला देऊन टाकले. ही सगळी सल आजही अल्बार्टावासीयांच्या मनात आहे. त्यामुळे आपण कॅनडाचा मूळ भूभाग नसून पूर्वी आपण स्वतंत्र होतो, हा इतिहास ते विसरले नाहीत. त्यामुळे अल्बार्टा स्वतंत्र व्हावा, या मागणीला समर्थन म्हणून ३.०२ लाख लोकांनी नुकतीच स्वाक्षकी केली. जनतेचे मतदान घेऊन आमच्या राज्याला स्वतंत्र देशाचा दर्जा द्या, अशी मागणी अल्बार्टा प्रांताच्या फुटीरतावादी गटाने केली आहे.
पण, त्यांची मागणी पूर्ण होऊच नये, यासाठी कॅनडाने याआधीच तरतूद केली आहे. कॅनडातील क्युबेक राज्याने १९८० आणि १९९५ मध्ये अशीच मागणी केली होती. त्यानुसार जनमतही घेतले. त्यावेळी ५०.६ लोकांनी कॅनडासोबत राहायचे म्हणून; तर ४९.४ टक्के लोकांनी कॅनडापासून वेगळे व्हायचे आहे, असे मतदान केले. हा फरक अत्यल्प होता. यातून धडा घेत कॅनडाने १९९८ साली कायदा बनवला की, "कुणालाही वाटते म्हणून कॅनडातून कोणतेही राज्य वेगळे होऊ शकतनाही.” त्यामुळे वेगळ्या अल्बार्टाच्या मागणीवर कॅनडामध्ये काहीही कारवाई होणार नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीवर कॅनडाला ५१वे राज्य आणि कॅनडाच्या पंतप्रधानांना त्या राज्याचे गव्हर्नर बनवण्याची स्वप्ने पाहणार्या डोनाल्ड ट्रम्प सरकारलाही अल्बार्टामध्ये रस आहे. कारण, कॅनडाच्या एकूण कच्च्या तेलाच्या उत्पन्नामध्ये ८४ टक्के उत्पन्न आणि नैसर्गिक वायूच्या एकूण उत्पादनापैकी ६१ टक्के उत्पादन एकट्या अल्बार्टा प्रांतातून होते. फेब्रुवारी महिन्यात अमेरिकी ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बॅसेंट यांनी म्हटले होते की, "अल्बार्टा अमेरिकेचा नैसर्गिक सहकारी आहे आणि इथले लोक स्वतंत्र विचारांचे आहेत. अमेरिका स्वतंत्र अल्बार्टासोबत काम करू शकते.” दुसरीकडे अल्बार्टा कॅनडापासून वेगळा व्हावा म्हणून जनमत संग्रहित करा, अशी मागणी करणार्यार ‘अल्बार्टा प्रॉस्पेरिटी प्रोजेक्ट’ या ग्रुपच्या नेत्याने, अमेरिकेच्या वित्त विभागाकडून यासाठी ५०० अब्ज डॉलर द्यावेत, अशी मागणी केली होती. तर, कॅनडाच्या कॅलगरी आणि एडमॉन्टन परिसराच्या हायवेवर ‘अल्बार्टाला अमेरिकेत विलीन करा,’ अशा आशयाचा बिलबोर्ड लावण्यात आला होता.
थोडक्यात, भारतात अस्थिरता आणण्यासाठी खलिस्तान्यांचे समर्थन करणार्याव कॅनडा सरकारला फुटीरता आणि दहशतवाद काय असतो, याचा अनुभव येत आहे.
९५९४९६९६३८