मुंबई : (West Bengal Violence) पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात मंगळवारी उशिरा रात्री स्थानिकांकडून जियागंज परिसरातील व्लादिमीर लेनिन यांचा पुतळा जमिनदोस्त करण्यात आला. यामुळे परिसरात प्रचंड तणाव वाढल्याचे दिसून आले. नुकत्याच जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांनंतर स्थानिकांद्वारेच राज्यभरात सुरू झालेल्या परिवर्तनाच्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर ही सदर घटना घडली. अशी माहिती आहे की, निवडणूक आयोगाने हिंसाचार भडकवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून दि. ८ मे रोजी पुतळ्याचे पुनर्निर्माण होणार असल्याचे म्हटले.
मुर्शिदाबादव्यतिरिक्त कोलकात्यासह पश्चिम बंगालच्या विविध भागांत तोडफोड आणि झटापटीच्या घटना समोर आल्या आहेत. कोलकात्यातील न्यू मार्केट परिसरात काही बांधकामे पाडण्यासाठी बुलडोझरचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला असल्याने राजकीय वाद अधिकच चिघळला आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष सुकांत मजूमदार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, निवडणुकोत्तर कोणताही हिंसाचार पक्ष सहन करणार नसल्याचा इशाराही दिला आहे.(West Bengal Violence)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक