दोन दिवस रेकी केली, टार्गेटवर गोळी झाडली... सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या-कोल्ड ब्लडेड मर्डर?

    07-May-2026
Total Views |

West Bengal Violence 2026
कोलकाता : (West Bengal Violence 2026) भाजप नेते सुवेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक चंद्रनाथ रथ (४२) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. बुधवार, दि. ६ मे रोजी रात्री १०.३० वाजता हा प्रकार घडला. पश्चिम बंगालमध्ये सत्तापालटानंतरही हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही. कोलकात्याहून मध्यमग्राम स्थित आपल्या घरी खासगी वाहनातून परतत असताना त्यांच्यावर हा गोळीबार झाला. ते चालकाच्या बाजूच्या सीटवर बसले होते. त्यांच्यासोबत चालक आणखी एक कार्यकर्ताही होता. कोलकात्यापासून सुमारे वीस किमी दूर मध्यमग्राम येथे त्यांच्या मागे एक कार आली. त्या कारने चंद्रनाथ यांच्या वाहनाचा रस्ता रोखला.
 
त्यानंतर एका दुचाकीवरुन हल्लेखोर उतरला. ज्यात चंद्रनाथ यांच्या वाहनावर १० राऊड फायर केल्या. ज्यातील चार गोळ्या रंगनाथ यांना लागल्या होत्या. त्यातील दोन गोळ्या छातीतून आरपार गेल्या. एक गोळी पोटात लागली. चालक बुद्धदेव बेरा यांनाही गोळी लागली. हल्लेखोर कार सोडून वाहन क्रमांक नसलेल्या दुचाकीने फरार झाले. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, चंद्रनाथ यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. चालक गंभीर आहे. भाजपने या प्रकरणात तृणमुल काँग्रेसवर आरोप लावला आहे.(West Bengal Violence 2026)
 
घटनेचे सीसीटीव्ही फूटेजही दिसत आहे. ज्यात ग्लॉक ४७ एक्स पिस्तुल आणि विना क्रमांक असलेली दुचाकी दिसत आहे. फॉरेन्सिक तपासात आढळलेली ग्लॉक ४७ एक्स पिस्तुल काही सामान्य गुन्हेगार वापरत नाहीत. हा हल्ला एकंदरीत सऱ्हाईत हल्लेखोर आणि प्रशिक्षित नेमबाजांनी केला असल्याचा संशय पोलीसांना आहे.
 
दुचाकीचा वाहन क्रमांक हटविण्यात आला होता. गुन्हेगारांनी वापरलेली चारचाकीचा वाहन क्रमांक हा बनवाट निघाला. त्यांनी हेल्मेट घातले असल्याने ओळख पटवणेही कठीण होत आहे. चंद्रनाथ रथ यांच्यावर गोळीबार झाल्याच्या एका तासात भाजपचे कार्यकर्ता रोहित रॉय यांच्यावर मध्यरात्री १२.३० वाजता गोळीबार झाला. त्यांची प्रकृतीही गंभीर आहे. ४ मे रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर एकूण पाच जणांची हत्या झाली आहे. ज्यात तीन जण भाजपचे तर दोन जण तृणमुल काँग्रेसशी निगडीत आहेत.(West Bengal Violence 2026)
 
सुवेंदु अधिकारी यांचा जीव धोक्यात!
 
ज्या प्रकारे सुवेंदु अधिकारी यांच्या स्वीय सहाय्यकाची हत्या झाली आहे, त्यावरुन लक्षात येते की प.बंगालमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. खुद्द सुवेंदु यांनी या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या स्वीय सहायकाची हत्या हा नियोजित कट असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. भाजप प.बंगालमध्ये अशा गुंडांचा सफाया लवकरच करेल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

<!-- Inject Script Filtered -->
ते म्हणाले, “चंद्रनाथ रथ यांची हत्या हा पूर्वनियोजित कट आहे. हा पूर्णपणे थंड डोक्याने केलेला हल्ला आहे. रथ यांच्यावर दोन तीन दिवसांपासून पाळत ठेवण्यात आली होती. पोलीसांना पुरावे सापडले आहेत. तपास सुरू आहे. प.बंगालमध्ये ममताराज असल्याच्या काळात तृणमुलने जंगलराज उभे केले, त्याचीच ही फळे आहे. भाजप सत्तेत आली आहे आता ह्या जंगलराजचा सफाया नक्कीच होईल.”
 
 
तृणमुल काँग्रेसने केली सीबीआय चौकशीची मागणी
 
तृणमुल काँग्रेसवर रथ यांच्या हत्येचा आरोप लागल्यानंतर आता त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. बुधवारी रात्री उशीरा तृणमुल काँग्रेसतर्फे याबद्दल प्रतिक्रिया देण्यात आली आहे. आम्ही मध्यमग्रामध्ये झालेल्या चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा निषेध करतो. या प्रकरणात कठोर कारवाई झाली पाहिजे. ज्याचा तपास न्यायालयाच्या अधीन राहून सीबीआयने करावा. तसेच भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या हत्येचा तपासही झाला पाहिजे, अशी मागणी तृणमुलने केली आहे.(West Bengal Violence 2026)
 
<!-- Inject Script Filtered -->
नेमकं काय घडलं होतं?
 
चंद्रनाथ रथ ज्या ठिकाणी बसले होते. हल्लेखोरांनी त्याच दिशेला वाहनावर गोळी झाडली. कारच्या खिडकीच्या ठिकाणी गोळ्यांचे निशाण दिसत होते. चंद्रनाथ यांना २०० मीटरवर असलेल्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच सुवेंदु अधिकारी रुग्णालयात पोहोचले. त्यांच्या पक्षातील अन्य महत्वाचे नेतेही दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत कार्यकर्त्यांनी रुग्णालयाला घेराव घालत कठोर कारवाईची मागणी केली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी रथ यांचे वाहन ताब्यात घेतले. गुन्हेगारांनी वापरलेली चारचाकीही ताब्यात घेण्यात आली आहे.(West Bengal Violence 2026)
 
कोण होते चंद्रनाथ रथ ?
 
सुवेंदु यांच्यासोबत पाच वर्षे काम करत होते चंद्रनाथ रथ. मिदनापूरच्या नंदीग्राम येथे राहणारे असून ते अविवाहित असल्याची माहिती आहे. २०००मध्ये त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर शॉर्ट सर्व्हीस कमिशनची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर त्यांनी एअर फोर्समध्ये अधिकारी पदावर सेवा बजावली होती. स्वेच्छानिवृत्त झाल्यावर त्यांनी सुवेंदु अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम सुरू केले. यापूर्वी त्यांच्या कुटूंबाचे तृणमुल काँग्रेसशी संबंध होते. चंद्रनाथ यांची आई पंचायत समिती सदस्य होती. सुवेदु यांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपत जाताना चंद्रनाथही सोबत होते.
 
सध्याची परिस्थिती काय?
 
चंद्रनाथ यांच्या चालकाची प्रकृती स्थिर असून सध्या ते व्हेंटीलेटरवर आहेत. बुद्धदेव यांच्यावर सध्या अपोलो मल्टिस्पेशलिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसांनी या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मध्यमग्राम येथील घटनास्थळी सध्या फॉरेन्सिकचे पथक पोहोचले आहे. त्यांनी काही निकामी काडतूसे जप्त केली आहेत.(West Bengal Violence 2026)
 
बारासातमध्ये चंद्रनाथ रथ यांचे शवविच्छेदन
 
सुवेंदु अधिकारी सध्या बारासात येथे पोहोचले आहेत. तिथे चंद्रनाथ रथ यांचे शवविच्छेदन सुरू होते. त्यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. “पोलीस आपले काम करत आहेत. मी पोलीस महासंचालकांच् संपर्कात आहे. काहीजणांना ताब्यात घेतले आहे. मला पूर्ण विश्वास आहे, या गुन्ह्यासाठी जे कुणी जबाबदार असतील त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचू. सीआयडी, पोलीस आणि फॉरेन्सिक टीमचा तपास योग्य दिशेने सुरू आहे.”, असे त्यांनी सांगितले.(West Bengal Violence 2026)