Vile Parle Hindu Conference : विले पार्लेतील ‘हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न; स्थानिकांच्या सहभागाने कार्यक्रमाला मोठे यश
05-May-2026
Total Views |
मुंबई : (Vile Parle Hindu Conference) विले पार्ले पूर्व येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या प्रांगणात रविवारी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सकल हिंदू संमेलन समिती, जीवन विकास वस्ती यांच्या वतीने भव्य ‘हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले. स्थानिक नागरिक, विविध संस्था आणि कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे संमेलन अत्यंत उत्साहात, जोशात आणि शिस्तबद्ध नियोजनातून यशस्वीरित्या पार पडले.(Vile Parle Hindu Conference)
जीवन विकास वस्तीतील स्थानिक कार्यकर्ते, सेवाभावी संस्था आणि समाजातील सज्जन शक्ती यांच्या सहकार्याने संमेलनाची तयारी करण्यात आली होती. क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी या कार्यक्रमासाठी संकुलाची जागा व आवश्यक सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्याने आयोजन अधिक सुलभ झाले. या संमेलनात विले पार्ले पूर्व नगरातील शहाजीराजे वस्ती आणि जीवन विकास वस्तीतील सुमारे ३०० हून अधिक नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये विविध गणेशोत्सव मंडळे, नवरात्र उत्सव मंडळे आणि स्थानिक मंदिरांचाही सक्रिय सहभाग होता.(Vile Parle Hindu Conference)
कार्यक्रमाची सुरुवात ‘महाराष्ट्र गीत’ सादर करून करण्यात आली. त्यानंतर भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वीरमाता अनुराधा ताई गोरे, प्रमुख वक्ते रमेश शर्मा, समिती अध्यक्ष मकरंद येडूरकर, सचिव प्रकाश सोनी आदी मान्यवर उपस्थित होते. मल्लखांब क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते गणेश देवरुखकर यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.(Vile Parle Hindu Conference)
हेही वाचा : Thane Hindu Conference : ठाणे पूर्व नगरात हिंदू संमेलनाची यशस्वी नांदी!संमेलनात गोमातेचे पूजन करून हिंदू संस्कृतीतील तिचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. यासाठी मनीष राजपुरोहित यांनी विशेष व्यवस्था केली होती. प्रारंभी स्थानिक कलाकारांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत हिंदू परंपरा, संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचे प्रभावी दर्शन घडवले. अजिता लेले, राधा पेठे आणि जयश्री संत यांनी सादर केलेल्या गणपती पोवाड्याने उपस्थितांची दाद मिळवली. तसेच जीवन विद्या मिशनच्या कार्यकर्त्यांनी विश्वप्रार्थनेचे महत्त्व पटवून दिले. सिद्ध कला सांस्कृतिक मंचाच्या महिलांनी मंगळागौरीतील पारंपरिक खेळ आणि फुगडीचे सादरीकरण करून वातावरण रंगतदार केले.(Vile Parle Hindu Conference)
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरली ती अवघ्या सहा वर्षांच्या कु. श्रावी संदेश महाडिक हिने सादर केलेली जोशपूर्ण ‘शिवगर्जना’. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात तिचे कौतुक केले. याशिवाय पार्लेश्वर व्यायाम शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मल्लखांब प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांना थक्क केले. विशेषतः ‘मशाल मल्लखांब’ने थरार निर्माण केला. यानंतर प्रमुख अतिथी अनुराधा ताई गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, तर प्रमुख वक्ते रमेश शर्मा यांनी हिंदुत्वाचे महत्त्व, सध्याची सामाजिक परिस्थिती आणि हिंदू समाजाची भूमिका यावर भाष्य केले.(Vile Parle Hindu Conference)
कार्यक्रमाचा समारोप ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाने झाला. श्रीमती विदुला आपटे यांनी अत्यंत सुरेल आवाजात सादर केलेल्या या गीताने वातावरण देशभक्तीमय झाले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. सकल हिंदू संमेलन समितीचे पदाधिकारी, स्थानिक नागरिक, विविध संस्था, लोकप्रतिनिधी व सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्या सहकार्यामुळे हे संमेलन अल्पावधीत अत्यंत यशस्वीरीत्या पार पडल्याचे आयोजकांनी सांगितले.(Vile Parle Hindu Conference)