Sunetra Pawar Victory : जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यास सदैव कटिबद्ध - सुनेत्रा पवार
05-May-2026
Total Views |
मुंबई : (Sunetra Pawar Victory) "हा सन्मान आदरणीय अजितदादांनी आजवर महाराष्ट्रासाठी केलेल्या लोकाभिमुख विकासकामांचा, तसेच बारामतीकरांनी दाखवलेल्या विश्वास, प्रेम आणि पाठिंब्याचा आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत बारामतीच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे.या सत्काराबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते."अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या एक्स हँडलवरून मंगळवार दि.५ रोजी व्यक्त केली आहे. (Sunetra Pawar Victory)
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल मंगळवार दि.५ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे अभिनंदन करण्यात आले. यानंतर सुनेत्रा पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते. (Sunetra Pawar Victory)