Ram Shinde Census Appeal : जनगणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा - प्रा. राम शिंदे

    05-May-2026
Total Views |
 Ram Shinde Census Appeal
 
मुंबई : (Ram Shinde Census Appeal) "देशाच्या १६व्या राष्ट्रीय जनगणनेला डिजिटल स्वरूपात सुरुवात झाली असून, नागरिकांच्या सहभागातून ही प्रक्रिया अधिक सक्षम होणार आहे. मी स्वतः स्व-गणना पूर्ण केली असून, आपणही यात सक्रिय सहभाग नोंदवावा.
 
हेही वाचा :  GalaxyEye : पाकिस्तानची झोप उडवणारी दृष्टी
 
१ मे पासून ते १५ मे या कालावधीत ‘se.census.gov.in’ या संकेतस्थळावर जाऊन आपली माहिती नोंदवा आणि या ऐतिहासिक उपक्रमाचा भाग बना.‘’जाणकार नागरिक , सक्षम राष्ट्र’’ही भावना जपून आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले योगदान निश्चित करा." आहे आवाहन विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी मंगळवार दि.५ रोजी आपल्या एक्स हँडलवरून नागरिकांना केले आहे.(Ram Shinde Census Appeal)