Railway Land Illegal Construction Mumbai : वांद्रे पूर्वेतील रेल्वेस्थानक परिसरातील झोपड्यावर कारवाई कायम

झोपडीधारकांच्या हिताचे संरक्षण करणे बंधनकारक

Total Views |
Railway Land Illegal Construction Mumbai
 
मुंबई : (Railway Land Illegal Construction Mumbai) मुंबई उच्च न्यायालयाने वांद्रे (पूर्व) येथील रेल्वेच्या जमिनीवरील गरीबनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवरील पाडकाम मोहीम सुरू ठेवण्यास प्सची रेल्वेला परवानगी दिली आहे. मात्र, 2021च्या सर्वेक्षणानुसार पात्र ठरलेल्या झोपडीधारकाच्या हिताचे संरक्षण करणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
 
न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे नुकतीच या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या पात्र सदस्यांच्या हिताचे संरक्षण केलेले असताना आणि त्यांना पर्यायी जागा उपलब्ध केल्याविना पश्चिम रेल्वेतर्फे त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याची बाब संघटनेच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.(Railway Land Illegal Construction Mumbai)
 
 याचिकाकर्त्यांचे वकील राजेश खोबरागडे यांनी मांडले की, पुनर्वसनासाठी पात्र ठरलेल्या कुटुंबांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता बेघर करण्यात आले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळ, एमएमआरडीए आणि वेस्टर्न रेल्वे यांच्या संयुक्त सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या संरचनांचे संरक्षण करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती.(Railway Land Illegal Construction Mumbai)
 
न्यायालयाने आपल्या आदेशात नमूद केले की, “अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामांवरील (Railway Land Illegal Construction Mumbai) पाडकाम मोहीम सुरू ठेवण्यास रेल्वेला परवानगी आहे.” रेल्वेच्या वतीने वकील आयुष केडिया यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, यापूर्वीही पाडकामाचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र “मानवी ढाल” उभी करून तो थांबवण्यात आला. त्यामुळे पुढील कारवाईसाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक होती. त्यांनी पुढे सांगितले की, पात्र प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मुंबई वन प्रोजेक्टअंतर्गत करण्यात येणार असून, यात वेस्टर्न रेल्वेच्या लाईन 6 चा विकास समाविष्ट आहे. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे.(Railway Land Illegal Construction Mumbai)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.