मुंबई : (Mamata Banerjee) पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी स्पष्ट शब्दांत जाहीर केले आहे की, त्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. मंगळवारी कोलकाता येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणूक निकालांवर गंभीर प्रश्न उपस्थित करत थेट निवडणूक आयोगावर (ECI) आणि भाजपवर संगनमताचे आरोप केले.(Mamata Banerjee)
“आम्ही जनादेशामुळे नाही, तर षडयंत्रामुळे हरलो आहोत. त्यामुळे मी राजीनामा देण्यासाठी राजभवनात जाणार नाही,” असे ठामपणे सांगत ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.(Mamata Banerjee)
ECI वर थेट आरोप...
ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत म्हटले, “निवडणूक आयोग हाच खरा खलनायक आहे. त्यांनी भाजपसोबत संगनमत करून १०० जागा चोरल्या.” त्यांनी पुढे सांगितले की, “आता माझ्याकडे जागा नाही; मी एक मोकळी पक्षी आहे. मी कुठूनही निवडणूक लढवू शकते, अगदी रस्त्यावर राहूनही.”(Mamata Banerjee)
पश्चिम बंगालसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. बंगालमध्ये भाजपने २९३ पैकी तब्बल २०७ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर तृणमूल काँग्रेसला केवळ ८० जागांवर समाधान मानावे लागले.
यामुळे १५ वर्षांनंतर ममता बॅनर्जी यांची सत्ता संपुष्टात आली असून, ९ मे रोजी भाजप आपले पहिले सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे.(Mamata Banerjee)
“अत्याचारांची परिसीमा ओलांडली”
पत्रकार परिषदेत ममता यांनी निवडणुकीदरम्यान प्रशासनाच्या कारभारावरही गंभीर आरोप केले.त्यांच्या मते,मतदानाच्या दोन दिवस आधी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. IPS आणि IAS अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या. “मी राजीव गांधी, मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील सरकार पाहिलं आहे, पण असे अत्याचार कधीच पाहिले नाहीत,” असा दावा त्यांनी केला.
ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी प्रक्रियेवरही गंभीर शंका उपस्थित केल्या.त्यांच्या आरोपानुसार,पहिल्या फेरीनंतरच भाजपने १९५-२०० जागांचा दावा सुरू केलाअंतिम निकाल येण्याआधीच विजयाचे चित्र रंगवले गेलेकाही ठिकाणी मतदान केंद्रांमध्ये घुसून कार्यकर्त्यांवर हल्ले झाले.
कायदेशीर लढाई
ममता यांनी जाहीर केले की, त्या निवडणूक आयोगाविरुद्ध कारवाई करणार आहेत.तसेच, पाच खासदारांसह १० सदस्यांची ‘फॅक्ट-फाइंडिंग कमिटी’ स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही त्यांनी दिली. “आम्ही पुन्हा उभे राहू आणि सिंहासारखे लढू,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
काय असेल पुढचं पाऊल?
या सगळ्या घडामोडींमुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. एका बाजूला भाजप सरकार स्थापनेच्या तयारीत असताना, दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी कायदेशीर आणि राजकीय लढाईची तयारी करत आहेत.
आता या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.