Shantanu Sinha Biswas ED Case : डीसीपी शांतनु सिन्हा बिस्वास विरोधात ईडीची लुकआऊट नोटीस; ‘सोना पप्पू’ सिंडिकेटने उघड केला मोठा घोटाळा?

Total Views |

 
Shantanu Sinha Biswas ED Case
 
मुंबई : (Shantanu Sinha Biswas ED Case) पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे मोठी खळबळ उडाली असून, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) कोलकाताचे DCP शांतनु सिन्हा बिस्वास यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. देशातून पळून जाण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘सोना पप्पूसिंडिकेटशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.(Shantanu Sinha Biswas ED Case)
 

याआधी, गेल्या महिन्यात ईडीने शांतनु सिन्हा बिस्वास यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर या प्रकरणात तपास अधिक तीव्र करण्यात आला असून, आता लुकआऊट नोटीस जारी केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.(Shantanu Sinha Biswas ED Case)

माध्यमांच्या वृत्तानुसार, शांतनू सिन्हा हे ममता बॅनर्जी यांच्या जवळचे मानले जातात. ते पूर्वी भवानीपूर मतदारसंघातील कालीघाट पोलीस ठाण्याचे प्रभारी होते आणि काही राजकीय कार्यक्रमांमध्येही त्यांची उपस्थिती दिसून आली होती. मतदानाच्या अंतिम टप्प्याच्या एक दिवस आधी ईडीने त्यांना चौकशीसाठी पुन्हा समन्स बजावले होते.(Shantanu Sinha Biswas ED Case)

हेही वाचा : Vijay Thalapathy : सत्तेच्या उंबरठ्यावर विजय! मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जवळपास निश्चित; त्रिशाचा जुना व्हिडिओ पुन्हा ट्रेंडिंग... 

 

सोना पप्पू सिंडिकेट’ प्रकरण काय?

या प्रकरणातील मुख्य आरोपी ‘सोना पप्पू’ हा दक्षिण कोलकात्यातील बालीगंज परिसरातील रिअल इस्टेट डेव्हलपर असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हत्येचा प्रयत्न, खंडणी, शस्त्र कायदा उल्लंघन यांसह १५ हून अधिक प्रकरणांमध्ये त्याचे नाव समोर आले आहे.(Shantanu Sinha Biswas ED Case)

फ्लॅट देण्याच्या आमिषाने लोकांकडून कोट्यवधी रुपये उकळूनही ना घर देणे, ना पैसे परत करणे अशा गंभीर आरोपांमुळे ईडीने Prevention of Money Laundering Act (PMLA) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एप्रिल २०२६ मध्ये आनंदपूर, अलीपूरसह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.

याशिवाय, फेब्रुवारी महिन्यात गोलपार्क परिसरात झालेल्या बॉम्बफेकीच्या घटनेतही ‘सोना पप्पू’चे नाव समोर आले. १०० हून अधिक लोकांच्या गटाने प्रतिस्पर्धी गटावर हल्ला केल्याचा आरोप आहे. २०१७ मध्ये पलाश जाना यांच्या हत्येप्रकरणीही त्याला अटक झाली होती, मात्र नंतर जामिनावर सुटका झाली.(Shantanu Sinha Biswas ED Case)

हे वाचलंत का? : Tiruppattur Election Result : एक मताने बदलली सत्ता समीकरणं! 'डीएमके'ला जबरदस्त धक्का...   
 

आता पुढे काय?

ईडीच्या या कारवाईनंतर पश्चिम बंगालमधील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार आणि तपास कोणत्या दिशेने जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Shantanu Sinha Biswas ED Case)

 

मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com