मुंबई : (Iran Drone Attack) इराण, अमेरिका आणि इस्त्रायलसोबत सुरू असलेल्या युध्दाच्या झळा आता भारतीयांना देखील बसत आहे. नुकताच संयुक्त अरब अमीरात युएईच्या (UAE) च्या फुजैराह पेट्रोलियम औद्यौगिक प्रकल्पावर इराणने ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात तीन भारतीय जखमी झाले. त्यांना रुग्नालयात दाखल केले असुन त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ४ मे रोजी इराणकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यात फुजैराह येथील पेट्रोलियम प्रकल्पाला आग लागली. या घटनेचा भारताने तीव्र निषेध केला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले, “फुजैराहवरील हल्ला आणि त्यात भारतीयांचे जखमी होणे आम्हाला अजिबात मान्य नाही. नागरी पायाभूत प्रकल्प आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणे तात्काळ थांबवावे.”
“फुजैराह वरील हल्ला आणि त्यात भारतीयांचं जखमी होणं आम्हाला अजिबात मान्य नाही. नागरी पायाभूत प्रकल्प आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य करणं तात्काळ थांबवावं” अशी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया दिली आहे. भारताने होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार व्यापार सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. सागरी व्यापाराला आंतरराष्ट्रीय कायघानुसार संरक्षण मिळाले पाहिजे आणि हा वाद शांततापूर्ण मार्गाने सोडवण्यासाठी भारत सर्व प्रयत्नांना पाठिंबा देणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांनीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटले की, “संयुक्त अरब अमिरातीवरील हल्ल्यांचा आम्ही तीव्र निषेध करतो. नागरिक आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. भारत यूएईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
मोदी यांनी पुढे सांगितले की, संवाद आणि राजनैतिक मार्गाने शांततापूर्ण तोडगा काढणे आवश्यक असून ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’तून सुरक्षित आणि निर्विघ्न नौवाहतूक सुनिश्चित करणे हे प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
Strongly condemn the attacks on the UAE that resulted in injuries to three Indian nationals. Targeting civilians and infrastructure is unacceptable.
India stands in firm solidarity with the UAE and reiterates its support for the peaceful resolution of all issues through…
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.