नागपूर: (Chandrashekhar Bawankule Statement) बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींचे थर्ड डिग्री राजकारण उध्वस्त केले आहे, अशी प्रतिक्रिया महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पश्चिम बंगाल निवडणूकांच्या निकालांवर दिली.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "पश्चिम बंगालच्या जनतेने विकासाला मतदान केले आहे. ममता बॅनर्जी यांच्या थर्ड डिग्री राजकारणाला उध्वस्त करण्याचे काम बंगालच्या मतदारांनी केले आहे. यावरून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी धडा घेतला पाहिजे. देश विकासाच्या बाजूने उभे आहे. देशातील जनता विकसित भारताच्या मागे उभी आहे. तरीही विरोधक अजूनही सुधरत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी २०४७ च्या महाराष्ट्रात घरी बसतील, असे राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे. देशाने मोदीजींना मजबूत साथ दिली असून पुढच्या काळातही ती अशीच असेल." (Chandrashekhar Bawankule Statement)
ते पुढे म्हणाले की, "ममता बॅनर्जी यांच्याकडून आमच्या हजारों कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या. संघ परिवार आणि भाजपचे काम, बुथवरील नियोजन, मोदीजींच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री अमीत शाह, अध्यक्ष नितीन नबीन या संपूर्ण टीमने काम केले. बंगालमध्ये एकदा सुशासन यावे आणि दृष्ट शासन जावे, अशी देशातील कार्यकर्त्यांची सद्भावना होती." (Chandrashekhar Bawankule Statement)
महाराष्ट्र नसरापूर येथील पीडित परिवाराच्या पाठीशी
नसरापूर येथील घटनेबद्दल बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "संपूर्ण महाराष्ट्र नसरापूर येथील पीडित परिवाराच्या पाठीशी उभा आहे. आरोपीला यमसदनी पाठवण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी पोलिस आणि सरकार करणार आहे."(Chandrashekhar Bawankule Statement)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....