BJP V/S Shiv Sena UBT : राऊतांसाठी ‘शब्दकोश’ नव्हे, ‘अश्वकोश’ची गरज – बन

    05-May-2026
Total Views |
BJP vs Shiv Sena UBT
 
मुंबई : (BJP vs Shiv Sena UBT) भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवार दि.५ रोजी संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर जोरदार टीका करताना म्हटले की, “मराठीमध्ये शब्दकोश असतो, पण राऊतांच्या भाषेसाठी ‘अश्वकोश’ तयार करावा लागेल.राऊत ज्या पातळीची भाषा वापरतात, त्यासाठी पारंपरिक शब्दकोश किंवा विश्वकोश अपुरे पडतील, हा ‘अश्वकोश’ उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करावा, जेणेकरून त्यांच्या पक्षाची अधोगती का झाली हे महाराष्ट्राला समजेल."
 
नवनाथ बन यांनी राऊतांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, “काँग्रेस किंवा विरोधक जिंकले की लोकशाहीचा विजय म्हणायचा, आणि भाजप जिंकली की लोकशाही धोक्यात आली असे म्हणायचे हा दुटप्पीपणा आहे.निवडणूक आयोग नव्हे, तर जनतेने ममता सरकारच्या १५ वर्षांच्या कारभाराचा हिशोब केला. तसेच महाराष्ट्रातही जनतेने महायुतीला पाठिंबा देऊन उद्धव ठाकरे यांच्या कारभाराला नकार दिला." (BJP vs Shiv Sena UBT)
 
नवनाथ बन यांनी इंडिया आघाडीवर टीका करत म्हटले की, “देशात आता या आघाडीला भवितव्य नाही.राऊतांनी आता पाकिस्तानमध्ये जाऊन निवडणूक लढवण्याचा माझा सल्ला आहे.भारतामध्ये जनता साथ देत नाही, त्यामुळे पाकिस्तान किंवा बांगलादेशमध्येच संधी शोधावी." (BJP vs Shiv Sena UBT)
 
हेही वाचा :  Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवार तर, राहुरीत अक्षय कर्डिले यांचा दणदणीत विजय
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत बन म्हणाले की, " देश विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे. “आम्ही बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करतो,” जनतेचा विश्वास भाजपवर कायम असल्यामुळे कोणत्याही टीकेचा परिणाम होणार नाही.देशातील जनता प्रभू राम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांसोबत उभी आहे." (BJP vs Shiv Sena UBT)
" नसरापूर येथील घटनेबाबत दोषींना कठोर शिक्षा देण्यात यावी. राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन असून, सरकार नसरापूर प्रकरणात गांभीर्याने लक्ष ठेवून आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात कायदा-सुव्यवस्था उत्तम आहे." असेही बन म्हणाले. (BJP vs Shiv Sena UBT)