मुंबई : (Ashish Shelar Statement) येत्या पावसाळ्यात आरे वसाहतीमधील विविध प्राधिकरणाकडे असलेल्या ६५ एकर जागेवर झाडे लावण्याचे नियोजन करा. तसेच आरे जंगलाची घनता वाढविण्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही कृती आराखडा तयार करा, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिले.(Ashish Shelar Statement)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे राज्य शासनाकडून ३०० कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात येणार आहे. मुंबईचे वाढते तापमान लक्षात घेता मंत्री आशिष शेलार यांनी या योजनेत मुंबई उपनगराचा सहभाग वाढवण्यासाठी आरे वसाहतीची पाहणी केली. या वसाहतीमध्ये असलेली शासकीय प्राधिकरणे आणि त्यांच्या कार्यालयात जाऊन कामकाज समजून घेतले, त्यांना जिल्हा नियोजनातून काही मदत करता येईल का, तसेच त्यांच्याकडे असलेल्या जागांपैकी मोकळी जागा आहे का? असल्यास किती वृक्ष लागवड करता येईल याबाबत आढावा घेण्यात आला.(Ashish Shelar Statement)
या दौऱ्यात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी, मुंबई महापालिका, एमएमआरडीए अशा संबंधित अधिकाऱ्यांना नोंदी करायला सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी या जागेवर वृक्ष किती लागू शकतात, कोणते लावणे अपेक्षित आहे तसेच काही ठिकाणी मियावाकी जंगल वाढवता येईल का. आरे मधील जंगलाची घनता वाढविण्यासाठी काय करता येईल. याचे संपूर्ण नियोजन व कृती आराखडा सादर करा, असे निर्देश मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.(Ashish Shelar Statement)
तसेच मेट्रो भवनसाठी जी जागा प्रस्तावित करण्यात आली होती, ती रिक्त असून त्या जागेवर वृक्षारोपण करता येईल का? आरे मेट्रो कारशेडमध्ये जी जागा रिक्त आहे त्यावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्याची घनता वाढविण्यासाठी काय करावे याबाबतही कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.(Ashish Shelar Statement)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....