Amit Shah : ...आणि अमित शाह शब्दाला जागले!

    05-May-2026
Total Views |
 
Amit Shah
 
मुंबई : (Amit Shah) प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला असून, बंगालच्या जनतेने एकमुखाने भाजपच्या पारड्यात मतांचे भरघोस दान टाकले आहे. या सगळ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचा संसदेत दिलेला शब्द खरा करुन दाखवल्याची चर्चा सध्या रंगली आहे.
 
गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये वक्फ संशोधन अधिनियमावर चर्चा सुरु असताना, तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी बंगालमध्ये येऊन अमित शाह यांनी भाषण करुन दाखवावे, असे आव्हान दिले होते. त्यावर अमित शाह यांनी “संसद ही राजकारणाचे हिशोब करण्याचा आखाडा नाही. मात्र, मी बंगालमध्ये येऊन छातीठोकपणे तृणमूलपेक्षा अधिक जागा जिंकेन,” असे अमित शाह यांनी त्यावेळी कल्याण बॅनर्जी यांना उत्तर दिले होते.(Amit Shah)
 
हेही वाचा :  बंगालपासून तामिळनाडूपर्यंत तुष्टीकरणाचे 'किल्ले' ध्वस्त!
 
प. बंगाल निवडणुकीचे निकाल लागल्यावर त्यात भाजपला देदिप्यमान विजय मिळाला असून, अमित शाह यांनी बंगालमध्ये केलेला आक्रमक प्रचार आणि प्रभावी रणनीतीचा हा परिपाक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकप्रकारे वर्षभरापूर्वी अमित शाह यांनी संसदेत स्वीकारलेले कल्याण बॅनर्जी यांना दिलेला शब्द पूर्ण करुन दाखवला आहे.(Amit Shah)
 
ममता दीदी यांनी विचारले होते, कोण आहेत अमित शाह?
 
2014 च्या निवडणुक प्रचारादरम्यान एका मुलाखतीमध्ये ममता दीदी यांनी अमित शाह यांना कमी लेखण्याच्या उद्देशाने कोण आहेत अमित शाह असा सवाल विचारला होता. त्यावेळी अमित शाह यांनी त्यांच्या कार्यातून त्यांना उत्तर दिले होते.