AC Local Passenger Growth : मुंबईकरांची एसी लोकलला पसंती वाढली

पश्चिम रेल्वेच्या एसी ईएमयू प्रवासी आणि महसुलात मोठी वाढ

Total Views |
 AC Local Passenger Growth
 
मुंबई : (AC Local Passenger Growth) पश्चिम रेल्वेच्या उपनगरी रेल्वेच्या एसी ईएमयू सेवांना प्रवाशांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, गेल्या काही वर्षांत प्रवासी संख्या आणि महसुलात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार 2017-18 पासून 2025-26 पर्यंत या सेवेत चढ-उतार दिसले असले तरी एकूण ट्रेंड वाढीकडे झुकणारा आहे.
 
2017-18 मध्ये एसी ईएमयू सेवेत दररोज सरासरी 10,403 प्रवासी प्रवास करत होते आणि महसूल 4.53 लाख रुपये होता. पुढील वर्षी 2018-19 मध्ये प्रवासी संख्येत तब्बल 77.16% वाढ होऊन ती 18,431 वर पोहोचली, तर महसूलही 62.82% वाढून 7.39 लाखांवर गेला.
 
2019-20 मध्ये किंचित घट दिसून आली; प्रवासी संख्या 3.27% नी घटली, मात्र महसुलात 4.68% वाढ झाली. मात्र 2020-21 हे वर्ष कोविड-19 महामारीमुळे सर्वाधिक प्रभावित ठरले. या काळात प्रवासी संख्या 89.04% नी घसरून फक्त 1,954 वर आली आणि महसूलही 88.96% नी कमी होऊन 85,443 रुपयांवर आला.(AC Local Passenger Growth)
 
यानंतर 2021-22 पासून पुनरुज्जीवन सुरू झाले. या वर्षात प्रवासी संख्या 205.17% वाढून 5,962 झाली, तर महसूल 197% वाढून 2.53 लाखांवर गेला. 2022-23 मध्ये ही वाढ आणखी वेगाने सुरू राहिली. प्रवासी संख्या 966.86% वाढून 63,607 झाली आणि महसूल 1041.88% वाढून 28.97 लाखांवर पोहोचला.(AC Local Passenger Growth)
 
2023-24 मध्ये प्रवासी संख्या 99,848 पर्यंत वाढली (56.98% वाढ) आणि महसूल 46.18 लाखांवर गेला (59.40% वाढ). 2024-25 मध्येही ही वाढ कायम राहून प्रवासी संख्या 1,27,570 (27.76% वाढ) आणि महसूल 58.91 लाख (27.55% वाढ) झाला.(AC Local Passenger Growth)
 
ताज्या 2025-26 आकडेवारीनुसार, एसी ईएमयू सेवेत दररोज सरासरी 1,48,955 प्रवासी प्रवास करत असून महसूल 68.46 लाख रुपये झाला आहे. यामध्ये अनुक्रमे 16.76% आणि 16.22% वाढ नोंदवली गेली आहे. प्रवासी सुविधा, आरामदायी प्रवास आणि वाढती मागणी यामुळे या सेवांचा विस्तार आणि महसूल दोन्ही सातत्याने वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.(AC Local Passenger Growth)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.