Sun TV Shares : ‘सन टीव्ही’लाही द्रमुक पराभवाच्या झळा

समभागांमध्ये नऊ टक्के घसरण

    04-May-2026
Total Views |
Sun tv shares
 
मुंबई : (Sun TV Shares) तामिळनाडूमध्ये एम. के. स्टॅलिन यांच्या द्रमुक पक्षाला मोठ्या पराभवाला सामोर जावे लागले असून, त्याचे परिणाम भांडवली बाजारावरही झाल्याचे सोमवारी दिसून आले. तामिळनाडूच्या निकालाचा परिणाम भांडवली बाजारातील ‘सन टीव्ही’च्या समभागांवर दिसून आला.(Sun TV Shares)
 
‘सन टीव्ही’चे मालकी हक्क हे मारन कुटुंबाकडे असून, कलानिधी मारन हे द्रमुक नेते एम. करुणानिधी यांचे नातू आहेत. ‘आयपीएल’मधील ‘हैद्राबाद सनरायझर्स’ संघाचे मालकी हक्कदेखील याच कुटुंबाकडे असून, कलानिधी यांची मुलगी काव्या मारन या संघाचे कामकाज सांभाळते आहे.(Sun TV Shares)
 
हेही वाचा  : Tamil Nadu Election Results : विजयमुळेच स्टॅलिन यांचा ‘विजय’ हुकला!- माजी सहकारी व्ही. एस. बाबू ठरला ‘जायंट किलर’
 
‘सन टीव्ही’ आणि द्रमुकचा थेट संबंध असल्याने आजच्या निकालातील सुरुवातीच्या कलानुसार द्रमुक पिछाडीवर पडल्यानंतर, ‘सन टीव्ही’च्या समभागांमध्ये तब्बल नऊ टक्क्यांपर्यंतची घसरण दिसून आली. आज भांडवली बाजारात व्यवहार सुरु झाले, तेव्हा या कंपनीच्या एका समभागाची किंमत 610 रुपयांच्या आसपास होती. मात्र, सुरुवातीच्या कलांमध्ये द्रमुक पिछाडीवर पडल्याने या समभागांची मोठी विक्री करण्यात आली. त्यामुळे ‘सन टीव्ही’ कंपनीचा समभाग घसरून 548 रुपयांपर्यंत खाली आले. दिवसा अखेरीस या कंपनीच्या समभागांचा भाव वधारुन 573 रुपयांवर बंद झाला.(Sun TV Shares)