BJP Victory Celebration : विजयाचा दिवस हा ऐतिहासिक - देवेंद्र फडणवीस

झालमुडी आणि रसगुल्ला खाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह सर्वांनी केला आनंद व्यक्त

    04-May-2026
Total Views |
BJP Victory
 
मुंबई : (BJP Victory Celebration) "आजचा विजयी दिवस हा आपल्या सर्वांकरीता ऐतिहासिक आहे.आम्हाला बाहेरचे म्हणणाऱ्यांना मी सांगितले की भाजपची निर्मिती केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी हेच बंगालचे होते.त्यामुळे भाजप हा खरा बंगालचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर विश्वास ठेऊन पश्चिम बंगालच्या जनतेने महापरिवर्तन करून दाखवले. आसाम, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल मधील भारतातल्या जना जनाचा हा विजय आहे. मोदी है तो मुनकिन है हे जनतेला माहीत आहे. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचे काम या निकालाने केले आहे.तर आसाममध्ये जेव्हापासून भाजप सरकार आले आहे तेव्हापासून तेथील दहशतवादी गतिविधि थांबली आहे."असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार दि.४ रोजी केले.(BJP Victory Celebration)
 
भाजपला पश्चिम बंगाल, आसाम आणि पाँडिचेरी येथे घवघवीत यश मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालय, मुंबई येथे सोमवार दि.४ रोजी जल्लोष करण्यात आला.यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर,कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर,मुख्य प्रवक्ते नवनाथ बन,महापौर रितू तावडे, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक,आमदार चित्रा वाघ यांसह भाजपचे आमदार ,प्रमुख नेते, नगरसेवक,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.(BJP Victory Celebration)
 
प्रास्ताविक मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केले.
 
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रसगुल्ला भरवून आनंद व्यक्त केला.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थितांनी झालमुडीचा देखील आस्वाद घेतला.यावेळी शंखनाद,ढोल ताशे यांचा गजर कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.(BJP Victory Celebration)
 
 
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,"पश्चिम बंगाल ,आसामचा विजय कोणत्या देवेंद्र फडणवीस यांच्या जाण्याने नाही तर हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासावरील आहे. लोकांनी हे आधीच ठरवले होते.मला फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश घेऊन या तिथे जायचे होते.हा लोकशाहीचा विजय आहे."(BJP Victory Celebration)
 
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की," देशभर भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेली प्रचंड मेहनत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शहा ,भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नविन यांनी घेतलेले कष्ट यामुळे हे यश मिळाले.आज श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आठवण येणे क्रमप्राप्त आहे.ज्यांनी भाजपला विचारधारा दिली आणि राष्ट्रीयत्वाचा सन्मान या सर्व राज्यांनी केला. आपल्या महाराष्ट्र राज्यातील ६००० कार्यकर्ते पश्चिम बंगाल मध्ये पूर्ण वेळ निवडणूक प्रचारासाठी गेले होते.त्यांनी रात्रीचा दिवस केला.त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचे अभिनंदन करतो."(BJP Victory Celebration)