अवघड होतं पण अशक्य मुळीच नव्हतं! अमित शाहांच्या रणनितीपुढे कसं कोसळलं ममता सरकार?
04-May-2026
Total Views |
(Image Credit - Amit Shah Facebook)
कोलकाता (Amit Shah strategy in West Bengal) : भारतीय जनसंघाची स्थापना करणारे श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्वप्न आज पूर्ण झाले. इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा भगवा अगदी डौलाने फडकला आहे. या विजयामागे हात आहे भारतीय राजकारणातील चाणाक्य म्हणवले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममतांचा अभेद्य गड कसा जिंकला याबद्दलच जाणून घेऊ...
अमित शाह स्वतः १५ दिवस प.बंगालमध्ये तळ ठोकून होते. अन्य पाच राज्यांमध्ये निवडणूका असताना क्रमांक दोनचा नेता या राज्याला इतके महत्व देतो याचा अर्थ भाजपसाठी हे राज्य किती महत्वाचे आहे हे लक्षात आलेच असेल. त्यामुळे हा विजय केवळ भाजपच्या लाटेच तर मुळीच नाही. तर इतकी वर्षे शांतपणे आपल्या वरिष्ठ नेतृत्वाला आश्वस्त करून निमूटपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आणि रणनितीचा आहे.
पश्चिम बंगालच्या राजकारणात ममता दिदींच्या सत्तेला सुरुंग लावणारे जायंट किलर ठरणारे चेहरे हे स्वतः अमीत शाह यांच्या टीममधील आहेत. सुवेंदु अधिकारी. हे भाजपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा मानले जात आहेत. दिलीप घोष हे देखील स्थानिक राजकारणातील प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले. मंगल पांडेय यांना अमित शाहांनी प्रभारी म्हणून नेमले. या निवडणूकीसाठी अमीत शाहांना स्वतःच्या विश्वासातील अनेक नेत्यांवर ही जबाबदारी दिली. रणनिती आखत पडद्यामागे निवडणूकीची तयारी केली होती.
अमित शाहांनी अखेरचे १५ दिवस पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून राहत कार्यकर्त्यांना बळ दिले. त्यांनी निवडणूकीच्या प्रचारादरम्यान रॅली मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या घरासमोरूनच नेली. यावेळी एक संदेश राज्यभर देण्यात आला की, ममतांच्या घरातच ममतांना आव्हान दिलं जाऊ शकतं. कार्यकर्त्यांनाही तो विश्वास निर्माण झाला. राज्यात संघटनात्मक पुर्नबांधणी अधिक बळकट करण्यात आली. स्थानिक चेहऱ्यांना पुढे करण्यात आले ज्यामुळे राज्यातील जनतेचा विश्वास निर्माण झाला. सुनील बन्सल आणि बिप्लब देब हेही या दरम्यान सक्रीय होते. संघटन मजबूत झालेच शिवाय प्रत्येक गोष्टीचा आढावा अमित शाह घेत.
हिंदूविरोधी चेहरा म्हणून ममतांना आव्हान
पश्चिम बंगालच्या राजकारणात विशिष्ट धर्मीयांचे लांगुलचालन करण्यातच ममता बॅनर्जींचा कल होता. त्यांच्या खासदारांनी तुष्टीकरणकरणारी गाणी गायली आणि भाजपने हेच मुद्दे उचलत ममताराजमध्ये झालेल्या हिंदूंवरील अत्याचाराचा मुद्दा उपस्थित केला.
सीएए, पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या बांगलादेशींच्या घुसखोरीचा मुद्दा, बंगाली भाषिक अस्मितेचा मुद्दा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
अखेर ती भविष्यवाणी खरी करुन दाखवली
अमित शाहांना स्वतःच्या रणनितीवर विश्वास असल्यानेच ममतांचा सुपडा दुपारी १ वाजताच साफ होईल, असे भाकित त्यांनी केले होते. ममता दिदींना दुपारी १ वाजताच टाटा बाय बाय करण्याची वेळ येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. अखेर आज निकालाचा दिवस ४ मे रोजी ही भविष्यवाणी खरी ठरली.