राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून राज्यसभेवर कुणाची वर्णी ?

    29-May-2026
Total Views |
Sunetra Pawar
 
मुंबई : (Sunetra Pawar) उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त पदाच्या कालावधीसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून राज्यसभेसाठी कुणाची वर्णी लागणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल.जून महिन्यात दहा राज्यांतील एकूण २४ जागा आणि एक पोटनिवडणूक अशा राज्यसभा जागांसाठी निवडणूक लागणार आहे.यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादीची कोट्यातील एक रिक्त जागा पण समाविष्ट आहे.
 
राष्ट्रवादी पक्षाकडून राज्यसभेसाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भूजबळ यांच्या नावाची चर्चा होती.पण ती चर्चा मागे स्वतः भूजबळ यांनी फेटाळून लावली होती.कारण राज्यातील कॅबिनेट मंत्रीपद सोडून देणे राजकीयदृष्ट्या कितपद फायद्याचे आहे याची कल्पना भुजबळ यांना आहेच.आणि धनंजय मुंडे मंत्रीपदास उत्सुक आहेत हे पण जगजाहीर आहे.
 
छगन भुजबळ आपला पुतण्या समीर भुजबळ यांच्या राजकीय पुर्नवसनासाठी देखील प्रयत्नात आहेत. छगन भुजबळ राज्यसभेवर गेलेच तर समीर भुजबळ यांना आपल मंत्रिपद मिळाव यासाठी भुजबळ ताकद लावणार.तसेच सध्या छगन भुजबळ आणि पार्थ पवार यांच्यातील टेंडर वाद चर्चेत आहे.राज्यसभेसाठी अविनाश आदिक आणि सुबोध मोहिते यांची नावे देखील समोर आली आहेत.काही दिवसापूर्वी आनंद परांजपे यांनी देखील पक्षास रामराम करून हाती धनुष्यबाण घेतले होते.
 
त्यामागे लाभाचे पद न मिळाल्याने त्यांची झालेली नाराजी हे देखील एक कारण आहे.तशी वेळ यानिमीत्ताने कुणावर येऊन पक्ष सोडायला लागू नये ही दक्षता पक्ष नेतृत्वास घ्यावी लागेल.(Sunetra Pawar)
 
 
राष्ट्रवादी कॉंग्रसकडून १९९९ पासून आतापर्यंत राज्यसभेवर प्रफुल्ल पटेल यांची सर्वाधिक वेळा निवड झाली आहे.तसेच तारीक अन्वर,वंदना चव्हाण,वसंत चव्हाण,शरद पवार यांना देखील संधी मिळाली आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील राज्यसभा सदस्य म्हणून काम केले होते.पण २०२३ च्या पक्ष विभाजनानंतर प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांची साथ दिली.
 
सध्या प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत राष्ट्रीय कार्यकारणीत पदाचा उल्लेख नसल्याने पक्षांतर्गत वाद सुरू होता.तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून पार्थ पवार यांची देखील नियुक्ती नुकतीच राज्यसभेवर झाली आहे.
 
महाराष्ट्र आणि दिल्ली दोन्ही ठिकाणचे राजकारण पूर्णता वेगळे आहे. सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांना राज्यातील राजकारणात विशेष रस असतो.दिल्लीत गेलेला राज्यातील नेता राज्यातील राजकारणातून बाजूला पडतो असाही एक समज आहे.तसेच राज्यात लुडबूड नको असणाऱ्या किंवा निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या नेत्याला दिल्लीत पाठवले जायचे.
 
पण प्रत्येक पक्षाची याबाबत मत भिन्नता आहे.सध्या राष्ट्रवादीत चाललेली खळबळ पाहता कोण राज्यसभा मिळवते ते पाहणे औत्सुक्याचे आहे.(Sunetra Pawar)