गुंदवली-डीएन नगर थेट मेट्रो सेवा पुन्हा सुरू करावी; प्रवाशांच्या सोयीसाठी आमदार संजय उपाध्याय यांचे एमएमआरडीएला पत्र

Total Views |
Mumbai Metro
 
मुंबई : (Mumbai Metro) मुंबई मेट्रोच्या पश्चिम उपनगरातील दोन महत्त्वाच्या मार्गांमध्ये एप्रिल २०२६ पासून झालेल्या बदलांमुळे प्रवाशांची वाढती गैरसोय लक्षात घेऊन बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे गुंदवली ते डी एन नगर आणि डीएन नगर ते गुंदवली ही थेट मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे.
 
दि. ८ एप्रिल २०२६ पासून मुंबई मेट्रो लाईन ७ (रेड लाईन) आणि लाईन २ए (यलो लाईन) स्वतंत्रपणे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मेट्रो लाईन ७ ही गुंदवली ते मीरा रोड आणि लाईन २ए ही डीएन नगर ते दहिसर या मार्गावर स्वतंत्रपणे कार्यरत आहे. दोन्ही मार्गांमधील प्रवाशांसाठी दहिसर हे इंटरचेंज स्थानक ठेवण्यात आले आहे. यापूर्वी या दोन्ही मार्गांमध्ये थेट सेवा उपलब्ध असल्याने प्रवाशांना मेट्रो बदलण्याची आवश्यकता भासत नव्हती.
 
हेही वाचा :  गोरेगावमध्ये उघड्यावर बकरी कुर्बानीला विरोध, शिवडीत अवैधरित्या ठेवलेल्या ४५ बकऱ्यांवर पालिकेची कारवाई
 
मात्र नव्या व्यवस्थेनंतर दररोज हजारो प्रवाशांना दहिसर स्थानकावर मेट्रो (Mumbai Metro)बदलून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवासाचा कालावधी वाढत असून गर्दीच्या वेळेत अतिरिक्त त्रास सहन करावा लागत असल्याची बाब आमदार उपाध्याय यांनी एमएमआरडीएला पाठविलेल्या पत्रात नमूद केली आहे.
 
 
 
प्रवाशांचा वेळ वाचावा, प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि मेट्रो सेवांचा वापर वाढावा यासाठी पूर्वीप्रमाणे गुंदवली-डीएन नगर थेट सेवा पुन्हा सुरू करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही मागणी मान्य झाल्यास बोरीवली, दहिसर, अंधेरी तसेच पश्चिम उपनगरातील लाखो मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या दैनंदिन प्रवासातील अडचणी लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(Mumbai Metro)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.