मुंबई : (Monsoon Control Room) मुंबई महानगर प्रदेशात पावसाळ्याच्या काळात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितींना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ दि. १ जून २०२६पासून विशेष पावसाळी नियंत्रण कक्ष सुरू करणार आहे. हा नियंत्रण कक्ष दिवसाचे २४ तास कार्यरत राहणार असून त्यामध्ये महामंडळाचे अधिकारी आणि अभियंते सतत कर्तव्यावर तैनात असतील.
मुंबई महानगर प्रदेशातील एमएसआरडीसीच्या अखत्यारितील विविध उड्डाणपुलांची देखभाल, दुरुस्ती आणि पावसाळ्यातील सुरक्षाविषयक उपाययोजनांची जबाबदारी अभियांत्रिकी विभागाकडे सोपविण्यात आली आहे. मुसळधार पाऊस, वाहतूक कोंडी, जलसाच्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपाययोजना करण्यासाठी हा नियंत्रण कक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
राज्य शासनाच्या (मंत्रालय) आपत्कालीन नियंत्रण कक्षासह बृहन्मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका आणि इतर संबंधित यंत्रणांशी या नियंत्रण कक्षाचा सातत्याने समन्वय ठेवला जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यातील कोणत्याही संकटाला अधिक प्रभावीपणे सामोरे जाणे शक्य होणार आहे. एमएसआरडीसीचा हा पावसाळी नियंत्रण कक्ष दि.३० सप्टेंबर २०२६ पर्यंत कार्यरत राहणार असून नागरिकांना मदत व तक्रार नोंदविण्यासाठी विशेष संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.(Monsoon Control Room)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.