१५ जागांवर मविआचे एकमत; उबाठा गटाची ४ जागांवर बोळवण

    29-May-2026   
Total Views |

Mahavikas Aghadi
 
मुंबई : (Mahavikas Aghadi) स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत निवडून जाणाऱ्या विधानपरिषदेच्या १७ जागांसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित झाले आहे. १५ जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून यापैकी काँग्रेस ८ जागा लढवणार असून उबाठा गटाची ४ तर, शरद पवार गटाची ३ जागांवर बोळवण करण्यात आली. उर्वरित दोन जागांवर अद्याप चर्चा सुरु असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.
 
विधानपरिषदेच्या जागावाटपासंदर्भात शुक्रवारी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बैठक पार पडली. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, काँग्रेस ८ ठिकाणी लढत असून उबाठा-शिवसेना ४ जागांवर आणि शरद पवार गट ४ जागांवर लढत आहेत. या आम्ही महाविकास आघाडी म्हणून या निवडणूकीला सामोरे जाणार आहोत.
 
...असे आहे १५ जागांचे जागावाटप
 
 नांदेड आणि नाशिक या दोन जागांवर तिन्ही पक्षांनी दावा केला असल्याने त्यावर आमची चर्चा सुरु आहे. येत्या दोन दिवसांत त्याबाबतचा निर्णय होईल, असेही सपकाळ यांनी सांगितले.
 
सपकाळ आणि राऊत यांच्यात विसंगती
 
दुसरीकडे, विधानपरिषदेच्या सर्व जागा लढवण्यावरून संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या बोलण्यात विसंगती पाहायला मिळाली. “अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांमध्ये आमच्याकडे खूपच कमी मतदान आहे. त्यामुळे त्या जागांमध्ये कशाला लक्ष घालायचे, याबाबत आमची चर्चा झाली. काँग्रेसला सर्व जागा लढवू द्या, त्यांना निवडणूक लढवण्याची खुमखूमी आहे,” असे राऊत म्हणाले.
 
 
यावर हर्षवर्धन सपकाळ यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “संख्याबळ हे आपल्या जागी आहे. लोकशाहीमध्ये निवडणूका लढवणे महत्वाचे आहे. निवडणूका जिंकणे हा वेगळा भाग आहे आणि आपल्या मुल्यांकरिता आणि विचारांकरिता लढणे हा वेगळा भाग आहे. महाविकास आघाडीची संघर्षाची भूमिका आहे.”(Mahavikas Aghadi)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....