हरित आणि शाश्वत रेल्वे वाहतुकीकडे भारताची मोठी झेप- देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन लवकरच धावणार;जिंद–सोनीपत मार्गावर हायड्रोजन फ्युएल सेल ट्रेन चालविण्यास मंजुरी;

10 डब्यांची ट्रेन 1200 किलोवॅट इंजिनसह ताशी 75 किमी वेगाने धावणार

Total Views |
 
Green and Sustainable Rail Transport
 
मुंबई : (Green and Sustainable Rail Transport) पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीच्या दिशेने मोठे पाऊल टाकत भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेल आधारित ट्रेनसेटला मंजुरी दिली आहे. उत्तर रेल्वेच्या जिंद–सोनीपत मार्गावर ही 10 डब्यांची विशेष ट्रेन लवकरच धावण्यास सज्ज झाली असून ती ताशी 75 किलोमीटर वेगाने धावणार आहे. या ट्रेनला 1200 किलो वॅट क्षमतेच्या हायड्रोजन फ्युएल सेल प्रणालीद्वारे ऊर्जा पुरवली जाणार आहे.
 
हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञानामध्ये हायड्रोजनच्या रासायनिक प्रक्रियेतून वीज निर्मिती केली जाते आणि या प्रक्रियेत केवळ पाण्याची वाफ उत्सर्जित होत असल्याने हे तंत्रज्ञान पारंपरिक इंधनांपेक्षा अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक मानले जाते. या उपक्रमामुळे भारत आता जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिकेसारख्या स्वच्छ रेल्वे तंत्रज्ञान वापरणाऱ्या देशांच्या यादीत सामील झाला आहे.
 
हेही वाचा :  पेसा क्षेत्रातील कृषी सेवक पदभरती प्रक्रिया गतीने पूर्ण करा - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
 
हरियाणातील जिंद–सोनीपत विभाग हा या प्रकल्पासाठी पायलट मार्ग म्हणून निवडण्यात आला आहे. जिंद येथे हायड्रोजन साठवण आणि रिफ्युएलिंगसाठी स्वदेशी सुविधा उभारण्यात आली असून पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनकडून आवश्यक परवानगीही देण्यात आली आहे.(Green and Sustainable Rail Transport)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.