सिडकोकडून 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय जाहीर; सिडको पाणीपुरवठा क्षेत्रात 28 मेपासून वेळापत्रक लागू

Total Views |
CIDCO Water Supply Schedule
 
नवी मुंबई : (CIDCO Water Supply Schedule) सिडको क्षेत्रातील नोड तसेच गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील जलसाठे, हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेले एल-निनो व आयओडी परिणाम, या पार्श्वभूमीवर गुरुवार, दि. २८ मेपासून सिडको पाणी पुरवठा क्षेत्रामध्ये दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला आहे.
 
सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण, मजीप्रा यांचे पाताळगंगा धरण यांद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असून, तापमानवाढीमुळे जलाशयांमधील पाण्याचे बाष्पीभवनही वाढत आहे. त्याचबरोबर धरणांतील उपयुक्त जलसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
 
पावसाळा अपेक्षेपेक्षा उशिरा सुरू होण्याची शक्यता विचारात घेता खबरदारीचा उपाय म्हणून सिडको क्षेत्रात गुरुवार, दि. २८ मे दहा टक्के पाणी कपात करण्यात येईल. (CIDCO Water Supply Schedule)
 
 
हेटवणे, मोरबे व इतर संबंधित जलस्रोतांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यमान होऊन जलाशयांतील उपयुक्त जलसाठ्यात अपेक्षित वाढ होईपर्यंत सदर पाणी कपात लागू राहील. अशाप्रकारचा पाणी कपातीचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी आपल्या क्षेत्राकरिता घेतला आहे. (CIDCO Water Supply Schedule)
 
पाणीपुरवठा बंद राहण्याचे वेळापत्रक
 
१ खारघर सोमवार
२ तळोजा शुक्रवार
३ कळंबोली व नावडे बुधवार
४ कामोठे शुक्रवार
५ नवीन पनवेल (पूर्व) सोमवार
६ नवीन पनवेल (पश्चिम) मंगळवार
७ करंजाडे गुरुवार
८ काळुंद्रे शुक्रवार
९ उलवे (सेक्टर-२, ३, ५, ६, १९, १९ए, २०, २१, २३, गव्हाण गाव व मोरावे गाव) मंगळवार
१० उलवे (सेक्टर-८, ८ए , ९, १०बी, १६, १६ए, १५, १७, १८, २४, कोपर, शिवाजी नगर, न्हावा, शेवा व बामणडोंगरी ) शुक्रवार
११ अ) उलवे (सेक्टर-२५ व २५ए )
ब) द्रोणागिरी रविवार
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.