मुंबई : (Hindu Society Unity) भांडुप येथील पिंपळेश्वर मंदिर परिसरात रविवार, दि. २४ मे रोजी मोठ्या उत्साहात हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाला विविध भागांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर प्रमुख अतिथी दीपक गुप्ते आणि प्रमुख वक्ते सुशील सहानी यांनी उपस्थितांना संस्कृती, परंपरा तसेच समाजातील एकतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. त्यांनी समाजात एकोपा आणि सांस्कृतिक मूल्यांचे जतन करण्याची गरज अधोरेखित केली.(Hindu Society Unity)
या संमेलनात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जीवन विद्या मिशनच्या वतीने भजन, हिंदुत्वावर आधारित एकल गीत तसेच पसायदान सादर करण्यात आले. या कार्यक्रमांना उपस्थित नागरिकांनी उत्साहाने दाद दिली.
संमेलनाचा मुख्य उद्देश हिंदू समाजामध्ये एकता वाढवणे आणि सांस्कृतिक वारसा जपणे हा असल्याचे आयोजकांनी सांगितले. उपस्थित नागरिकांनी अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक जागरूकता वाढते, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. इंद्रजीत तिवारी, श्री. विनोद मिश्रा, श्री. राजेंद्रसिंह रावत, श्री. संतोष कोरडे आणि श्री. सचिन लाड यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. साधना लाड यांनी केले.(Hindu Society Unity)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक