भोपाळ हिंसाचार प्रकरणात मोठा खुलासा; आरोपींचा बजरंग दलाशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण

    19-May-2026   
Total Views |

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भोपाळ येथे ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याच्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाचाही बजरंग दल किंवा अन्य कोणत्याही हिंदू संघटनेशी संबंध नाही. या प्रकरणानंतर इस्लामी कट्टरपंथी जमावाने बजरंग दलाचे नाव घेत हिंसक आंदोलन केले होते आणि उघडपणे ‘सर तन से जुदा’सारख्या घोषणा देत दगडफेक केली होती.

एका हॉटेलमध्ये हिंदू महिलेसोबत आढळलेल्या मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली ज्या सात जणांना अटक करण्यात आली आहे, त्यापैकी एकही व्यक्ती बजरंग दल किंवा इतर कोणत्याही हिंदू संघटनेशी संबंधित नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण सात जणांना आरोपी केले असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. उर्वरित सहा आरोपींची नावे बृजेंद्र प्रजापती, प्रतीक चौकसे, लालाराम मीणा, रमेश, अजय आणि अमन अशी आहेत.

फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांकडून सध्या सातत्याने छापेमारी, तसेच उपद्रवात सहभागी झालेल्या इतर लोकांची ओळख पटवण्यासाठी व्हिडिओ फुटेज तयापण्याचे काम सुरू आहे. 

जमावाकडून पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड
हिंदू कार्यकर्त्यांनी मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याची बातमी पसरल्यानंतर १२ मे २०२६ रोजी भोपालच्या रस्त्यांवर शेकडो मुस्लिम समुदायातील लोक आंदोलनासाठी उतरले होते. यावेळी जमाव आक्रमक झाला आणि ‘सर तन से जुदा’ तसेच ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या हिंसक आंदोलनादरम्यान जमावाने रस्त्यावर उभ्या असलेल्या सामान्य नागरिकांच्या वाहनांची तसेच पोलिसांच्या गाड्यांची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. त्यानंतर प्रशासनाने शांतता राखण्यासाठी पीर गेट, शाहजहाँबाद आणि आसपासच्या संवेदनशील भागांत बीएनएसएस कलम १६३ (पूर्वीचे सीआरपीसी कलम १४४) लागू केले. परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.






ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक