“मोटेगावकर देशमुखांचे जवळचे, मग राऊत गप्प का?” — नवनाथ बन यांचा सवाल

    19-May-2026
Total Views |
NEET Paper Leak
 
मुंबई : (NEET Paper Leak) भाजपचे प्रदेश प्रवक्ते नवनाथ बन यांनी नीट पेपरफुटी प्रकरणावरून संजय राऊत यांच्यावर मंगळवार दि.१९ रोजी जोरदार टीका करताना म्हणाले,“या प्रकरणात दोषी कोणताही असो, त्याच्यावर सी बी आय आणि केंद्र सरकारमार्फत कठोर कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. मोटेगावकरांनी सार्वजनिक मंचावर स्वतःला अमित देशमुख यांचा माणूस असल्याचं सांगितल होतं. काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय असलेला तोच व्यक्ती या प्रकरणातील सूत्रधार ठरत आहे. मग संजय राऊत अमित देशमुखांना प्रश्न का विचारत नाहीत?” काँग्रेस आणि पेपरफुटीमधील संबंधांची चौकशी व्हावी, अशी मागणीही बन यांनी केली.
 
नवनाथ बन यांनी नीट पेपरफुटी प्रकरणात काँग्रेसशी संबंधित लोकांची नावं पुढे येत असल्याचा दावा केला. “कुणी कुणाच्याही जवळचं असलं तरी त्याला सोडलं जाणार नाही. काही ठिकाणी काँग्रेसचे आणि पेपरफुटीचे थेट संबंध समोर येत आहेत." असही बन म्हणाले.
 
महागाईच्या मुद्द्यावरून नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. "अनेक देशांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर प्रचंड वाढले, पण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारतात सर्वसामान्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला नाही. आज काँग्रेसचं सरकार असत तर पेट्रोल २००-३०० रुपये लिटर झालं असत. उद्धव ठाकरे पंतप्रधान असते तर ५०० रुपये लिटर पेट्रोल झाल असत,” असा टोला बन यांनी लगावला. (NEET Paper Leak)
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांना नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिल. “पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौरे फोटोसेशनसाठी करत नाहीत. ते भारताची जागतिक रणनीती मजबूत करण्यासाठी जातात. पहलगाम हल्ल्यावेळी उद्धव ठाकरे लंडनमध्ये थंड हवा खात होते, तर मोदी देशासाठी रणनीती आखत होते,” अशी टीकाही बन यांनी केली.
 
"उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडत नाहीत आणि संजय राऊत भांडुपच्या बाहेर पडत नाहीत.हिम्मत असेल तर मातोश्रीबाहेर लाटणं-बेलन घेऊन महिला मोर्चा काढा."असं आव्हानही बन यांनी दिलं.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच कौतुक करताना नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “देवा भाऊ मंत्रालयात प्रत्येकाला भेटतात, राज्यभर फिरतात. उद्धव ठाकरे मात्र घरात बसून ‘ठिपक्यांची रांगोळी’ पाहत होते.” असा टोला बन यांनी लगावला. (NEET Paper Leak)