ग्रामविकास व पंचायतराज विभागाची मंत्रालयात आढावा बैठक संपन्न

    19-May-2026
Total Views |
Ministry Review Meeting Mumbai
 
मुंबई : (Ministry Review Meeting Mumbai) ग्रामविकास व पंचायतराज विभागाची सोमवार दि.१८ रोजी मंत्रालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी विभागाचे नवनियुक्त प्रधान सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना पुष्पगुच्छ प्रदान करून शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा गौरव करण्यात आला.
 
१ जानेवारी २०२५ पासूनच १०० % कामकाज ई ऑफिसवर आहे त्यामुळे प्रशासनातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी बनले आहे. बैठकीस उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या अखत्यारितील विविध विषयांबाबत सविस्तर आढावा सादर केला.
 
 
"डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचा प्रशासकीय अनुभव व कार्यपद्धतीचा विभागाच्या कामकाजाला येत्या काळात निश्चितच सकारात्मक लाभ होईल."असा विश्वास यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
 
यावेळी ग्रामविकास मंत्री यांचे खाजगी सचिव सुनील कोठेकर, उपसचिव प्रशांत पाटील, सहसचिव भरोसे, सचिव मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सतीश चिखलीकर यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.(Ministry Review Meeting Mumbai)