अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना १६४ कोटींचा निधी मंजूर

    19-May-2026   
Total Views |
Farmer Compensation Maharashtra
 
मुंबई : (Farmer Compensation Maharashtra) राज्य सरकारने मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १६४ कोटी ८३ लाख ४४ हजार रुपयांच्या मदत निधी वितरणास मंजुरी दिली आहे. सोमवारी महसुल विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.
 
मार्च २०२६ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी १६४ कोटी ८३ लाख ४४ हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.
 
 
यामुळे सांगली, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड, धाराशिव, जालना, लातूर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या १९ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Farmer Compensation Maharashtra)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....